AFG vs PAK: अफगाणिस्तानने दाखवलं पाकिस्तानला आस्मान! 6 विकेट्सने टी20 मॅच जिंकत रचला इतिहास

शारजाहमध्ये झालेल्या टी20 सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
Afghanistan
AfghanistanDainik Gomantak

Afghanistan vs Pakistan: युएईमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान संघात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शारजाहमध्ये पार पडला. सामन्यात अफगाणिस्तानने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. याबरोबरच हा विजय अफगाणिस्तानसाठी ऐतिहासिक ठरला.

अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला आहे. यापूर्वी कधीही अफगाणिस्तानने पाकिस्तानला पराभूत केले नव्हते.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान संघात आत्तापर्यंत 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चार वनडे आणि चार टी20 सामन्यांचा समावेश आहे. यातील चारही वनडेत पाकिस्तानने विजय मिळवला आहे, तर चार टी20 सामन्यांपैकी पहिले तीन सामने पाकिस्तानने जिंकले होते, तर आता चौथा सामना अफगाणिस्तानने आपल्या नावावर केला आहे.

Afghanistan
Asia Cup 2023: BCCI समोर पाकिस्तानला झुकावं लागणार, आशिया चषकाचे सामने PAK मधून...!

अफगाणिस्तानचा विजय

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली होती. पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली आणि शिस्तबद्ध गोलंदाजी करत पाकिस्तानच्या धावगतीवर चांगलाच लगाम लावला. पाकिस्तानला 20 षटकात 9 बाद 92 धावाच करता आल्या. पाकिस्तानकडून एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

पाकिस्तानकडून इमाद वासिमने सर्वाधिक 18 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त सईम आयुब (17), तय्याब ताहीर (16) आणि कर्णधार शादाब खान (12) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली.

अफगाणिस्तानकडून फझलहक फारूकी, मुजीब उर रेहमान आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अझमतुल्लाह ओमरझाई, नवीन उल हक आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Afghanistan
India vs Pakistan Cricket: शाहिद आफ्रिदी म्हणतोय, 'मोदी साहेबांना विनंती करणार...'

त्यानंतर 93 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवातही फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी 45 धावांतच 4 विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर मोहम्मद नबीने अफगाणिस्तानला विजय मिळवून देण्याची जबाबदारी घेतली. त्याला नजीबुल्लाह झाद्रानने चांगली साथ दिली.

या दोघांनी नंतर विकेट न जाऊ देता अफगाणिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अफगाणिस्तानने 17.5 षटकात 4 बाद 98 धावा करत सामना जिंकला. नबीने नाबाद 38 धावांची नाबाद खेळी केली. तसेच नजीबुल्लाहने नाबाद 17 धावा केल्या. पाकिस्तानकडून इहसानुल्लाने 2 विकेट्स घेतल्या. तसेच नसीम शाह आणि इमाद वासिम यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दरम्यान, नबीने केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com