Yuzvendra Chahal  Dainik Gomantak
क्रीडा

See You At Work... सहा विकेट घेत चहलचा करिष्मा; म्हणाला, ''तोच खरा योद्धा...''

Team India's Star Spinner Yuzvendra Chahal: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे.

Manish Jadhav

Team India's Star Spinner Yuzvendra Chahal: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. चहलला नुकत्याच पार पडलेल्या ICC विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही, त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठीही त्याला संघात स्थान मिळाले नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात नसताना चहलने सोशल मीडियावर स्मायली इमोटिकॉन तयार केले होते. चहल सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हरियाणाकडून खेळत असून पहिल्याच सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली होती. या सामन्याच्या एका दिवसानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर चहलच्याच नावाची सुरु झाली.

दरम्यान, चहलने हरियाणाकडून उत्तराखंडविरुद्ध सहा विकेट घेतल्या. हरियाणाच्या गोलंदाजीत हर्षल पटेल आणि राहुल तेवतियासारखे खेळाडूही आहेत, ज्यांची टीम इंडियासाठी (Team India) निवड झाली आहे. हर्षल पटेलनेही टीम इंडियासाठी पदार्पण केले आहे. उत्तराखंडचा कर्णधार जीवनज्योत सिंगशिवाय चहलने दिक्षांशु नेगी, स्वप्नील सिंग, अखिल रावत आणि मयंक मिश्राला बाद केले.

चहलने सोशल मीडियावर एक स्ट्रॉन्ग मेसेज शेअर केला आहे. त्याने त्याच्या फोटोसोबत एक स्ट्रॉन्ग कोट शेअर करत लिहिले की, 'जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करता तेव्हा स्वत:वर संयम ठेवणे हीच खऱ्या योद्ध्याची ओळख असते.' चहलने टीम इंडियासाठी एकूण 72 एकदिवसीय आणि 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

चहलच्या खात्यात 121 एकदिवसीय आणि 96 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. काही काळापूर्वी व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्पिनर म्हणून चहलला टीम इंडियाची पहिली पसंती असायची, पण आता काही काळापासून त्याचे संघातील स्थान निश्चित झालेले नाही. चहलला आशा आहे की, तो पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी (World Cup) टीम इंडियात परतेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT