Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

Sanju Samson: संजू सॅमसनने बॅट सोडून हाती घेतली बंदूक

Sanju Samson Post: भारतीय संघातून बाहेर पडणारा 28 वर्षीय फलंदाज संजू सॅमसनचा नवा अवतार समोर आला आहे. बॅट सोडून त्याने बंदूक हाती घेतली.

Manish Jadhav

Sanju Samson Weapon In Hand: भारतीय संघातून बाहेर पडणारा 28 वर्षीय स्टार फलंदाज संजू सॅमसनचा नवा अवतार समोर आला आहे. बॅट सोडून त्याने चक्क बंदूक हाती घेतली. एवढेच नाही तर त्याने सोशल मीडियावर एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये तो टार्गेटवर निशाणा साधताना दिसत आहे.

संजू सॅमसनने बंदूक उचलली

स्टार फलंदाज संजू सॅमसनने (Sanju Samson) शुक्रवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या फोटोत तो हातात बंदूक घेऊन उभा आहे. समोर एक टार्गेट बार आहे आणि संजूने एका बाजूला बंदूक ठेवली आहे.

अद्याप कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळालेली नाही

संजू सॅमसनला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळालेली नाही. भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेचाही तो भाग नाही. सॅमसन या वर्षी जानेवारीमध्ये टीम इंडियाच्या जर्सीमध्ये शेवटचा दिसला होता, जेव्हा त्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत भाग घेतला होता. 2015 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

8 वर्षात फक्त 28 सामने खेळले

28 वर्षीय संजू सॅमसनला आतापर्यंत फार कमी संधी मिळाल्या आहेत. 2015 साली T20 च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनने आतापर्यंत दोन फॉरमॅटमध्ये केवळ 28 सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 सामने आणि टी-20 मध्ये भारताकडून 17 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने वनडे फॉरमॅटमध्ये 2 आणि टी-20 इंटरनॅशनलमध्ये एक अर्धशतक झळकावले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सॅमसनने 58 सामन्यांमध्ये 3446 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT