Sanju Samson Dropped: '...म्हणून संजू सॅमसनला वगळलं', कर्णधार धवनचे स्पष्टीकरण

रविवारी झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या वनडेतून संजू सॅमसनला भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघातून वगळण्यात आले होते.
Sanju Samson
Sanju Samson Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanju Samson Dropped: न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील वनडे मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील रविवारी हेमिल्टन येथे होणारा दुसरा सामना पावसामुळे 12.5 षटकांच्या खेळानंतर रद्द करण्यात आला. दरम्यान, या सामन्यासाठी भारताच्या अंतिम 11 जणांच्या संघातून यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला वगळण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय संघ व्यवस्थापनेवर टीका झाली.

पण, आता भारताचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) सॅमसनला वगळण्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

चालू न्यूझीलंड दौऱ्यात वनडे मालिकेपूर्वी झालेल्या टी20 मालिकेतील एकाही सामन्यात सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे त्याला किमान वनडे मालिकेत संधी मिळेल अशी अनेकांनी शक्यता वर्तवली होती.

त्यानुसार त्याला पहिल्या वनडेत संधी मिळालीही आणि त्यानेही या सामन्यात 36 धावांची छोटेखानी, पण महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने श्रेयस अय्यरसह 94 धावांची भागीदारीही केली. पण असे असतानाही दुसऱ्या वनडेसाठी मात्र त्याला वगळून अष्टपूलू क्रिकेटपटू दीपक हुडाला संधी देण्यात आली होती.

Sanju Samson
संजू सॅमसन- दीपक हुडा जोडीचा खास विक्रम, रोहित-राहुलला टाकलं मागे

याबद्दल बोलताना शिखरने सांगितले, 'आम्हाला सहावा गोलंदाजीचा पर्याय हवा होता. म्हणून संजू सॅमसनला वगळावे लागले आणि हुडाला संधी देण्यात आली. दीपक चाहरला संधी दिली कारण तो चेंडू चांगल्या प्रकारे स्विंग करू शकतो. आमचे काही खेळाडू विश्रांती करत आहेत, पण तरीही संघ मजबूत आहे. यातून संघात किती सखोलता आहे, हे दिसते.'

दुसऱ्या वनडेसाठी सॅमसनबरोबरच शार्दुल ठाकूरलाही वगळण्यात आले होते. त्याच्याऐवजी दीपक चाहरला संधी देण्यात आली होती.

Sanju Samson
Sanju Samson Video: मोठ्या मनाचा सॅमसन! संधी मिळाली नाही, पण माणूसकी दाखवत जिंकली मनं

दरम्यान दुसऱ्या वनडे सामन्यात सातत्याने पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 12.5 षटकांत 1 बाद 89 धावा केल्यानंतर सामना रद्द करण्यात आला.

त्यामुळे आता भारताला मालिकेतील पराभव टाळायचा असेल, तर 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. कारण पहिला सामना न्यूझीलंडने जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे, तर दुसरा सामना रद्द झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडला मालिका विजयाची संधी आहे, तर भारताला बरोबरी साधण्याची संधी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com