Sanjay Manjrekar on Tilak Varma Dainik Gomantak
क्रीडा

Tilak Varma: 'टी20मध्ये अपयशी होऊन वनडेसाठी सज्ज...' तिलकबद्दल मांजरेकरांचा खोचक टोला

Sanjay Manjrekar on Tilak Varma: आशिया चषकासाठी भारतीय संघात तिलक वर्माच्या निवडीबद्दल संजय मांजरेकरांनी भाष्य करताना खोचक टोला लगावला आहे.

Pranali Kodre

Sanjay Manjrekar cheeky remark on Tilak Varma Inclusion in India Squad for Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) निवड समीतीने सोमवारी (21 ऑगस्ट) 17 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवड समीतीने आशिया चषकासाठी भक्कम फलंदाजी फळी निवडली आहे.

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे ते मधल्या फळीत ते खेळण्याची शक्यता आहे. याबरोबर भारताकडे सूर्यकुमार यादवचाही पर्याय असणार आहे. त्याचबरोबर भारताच्या वनडे संघात पहिल्यांदाच तिलक वर्मालाही संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याचाही एक पर्याय भारताकडे मधल्या फळीत असणार आहे.

तिलकला मिळालेल्या या संधीबद्दल माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी खोचक टिपण्णीही केली आहे.

तिलकने 3 ते 13 ऑगस्टदरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पणातील टी२० मालिका खेळली. या मालिकेत त्याने शानदार कामगिरी केली. त्याने या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात आक्रमक खेळताना 39, 51 आणि नाबाद 49 धावांची खेळी केली.

तसेच चौथ्या सामन्यात त्याने नाबाद 7 आणि पाचव्या सामन्यात 27 धावा केल्या. मात्र त्यानंतर सध्या आयर्लंड विरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेच तो पहिल्या सामन्यात शून्य आणि दुसऱ्या सामन्यात 1 धावेवर बाद झाला.

त्याची हीच कामगिरी लक्षात घेत मांजरेकरांनी त्याचे कौतुक करण्याबरोबरच खोचक टोलाही लगावला. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना मांजरेकर म्हणाले, 'तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीकडे पाहा, त्याची आकवारी चांगली आहे की तो भारतीय संघातील निवडीसाठी पात्र आहे.'

'आणि खोचक टिपण्णी अशी की टी20 क्रिकेटमधील त्याच्या शेवटच्या दोन सामन्यात अपयशी होऊन तो 50 षटकांच्या क्रिकेटसाठी सज्ज होत आहे. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्यात कमजोरी शोधणे कठीण आहे.'

तसेच मांजरेकर पुढे म्हणाले, 'मी यापूर्वी म्हटले तसे चार, पाच आणि सहा क्रमांकावर प्रतिभाशाली, प्रभावी खेळाडू असणे चांगले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये एक, दोन आणि तीन क्रमांकावर खेळण्यासाठी खूप गर्दी आहे. त्यामुळे आता चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर पण दर्जेदार फलंदाज असू द्यात.'

देशांतर्गत क्रिकेटमध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या तिलक वर्माच्या लिस्ट ए क्रिकेटमधील आकडेवारीवारीबद्दल सांगायचे झाल्यास त्याने 25 सामने खेळले असून 56.18 च्या सरासरीने 5 शतके आणि 5 अर्धशतकांसह 1236 धावा केल्या आहेत.

  • आशिया चषकासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा.

    राखीव खेळाडू - संजू सॅमसन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa School Closed: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले; शुक्रवारी शाळांना सुट्टी जाहीर

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT