Tilak Varma celebration for Samaira: भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजविरुद्ध रविवारी टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात २ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. पण असे असले तरी या सामन्यातील सकारात्मक गोष्ट म्हणजे भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने केलेले अर्धशतक.
दरम्यान, त्याने अर्धशतक केल्यानंतर खास सेलिब्रेशन केलं होतं. हे सेलिब्रेशन त्याने कोणासाठी केलं होतं, याचा खुलासा केला आहे.
तिलकने या सामन्यात 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याने अर्धशतकानंतर केलेले सेलिब्रेशन रोहित शर्माची 4 वर्षांची मुलगी समायरा हिच्यासाठी केले असल्याचे सांगितले. तिलकने दोन्ही हाताने थम्प्स अप करत सेलिब्रेशन केले होते.
या सेलिब्रेशनबद्दल तिलकने सांगितले की 'ते रोहित शर्माची मुलगी सॅमीसाठी होते. मी सॅमीच्या खूप जवळ आहे. मी तिला प्रॉमिस केलं होते की जेव्हा मी शतक किंवा अर्धशतक करेल, तेव्हा मी ते तिच्यासाठी करेल.'
तिलक रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. आयपीएल दरम्यानच त्याच्यात आणि छोट्या सॅमीमध्ये मैत्री झाली होती.
दरम्यान, या सामन्यात तिलक वर्माव्यतिरिक्त भारताकडून कोणाला खास काही करता आले नव्हते. तिलकशिवाय केवळ इशान किशन (27) आणि हार्दिक पंड्या (24) यांना 20 धावांचा टप्पा पार करता आला. त्यामुळे भारताने 20 षटकात 7 बाद 152 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून अकिल होसेन, अल्झारी जोसेफ आणि रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
त्यानंतर वेस्ट इंडिजने 153 धावांचे आव्हान 18.5 षटकात 8 विकेट्स गमावत 155 धावा करून पूर्ण केले. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने 40 चेंडूत 67 धावांची खेळी केली.
तसेच कर्णधार रोवमन पॉवेलने 21 धावा आणि शिमरॉन हेटमायरने 22 धावांची खेळी केली. अखेरीस 9 व्या विकेटसाठी अकिस होसेन आणि अल्झारी जोसेफ यांनी नाबाद 26 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.
भारताकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच युजवेंद्र चहलन 2 विकेट्स घेतल्या, तसेच अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमारने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.