Shoaib Malik & Sania Mirza  Dainik Gomantak
क्रीडा

Shoaib Malik: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने LIVE शोमध्ये केला डान्स; Video

Shoaib Malik Viral Video: पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज शोएब मलिक सध्या चर्चेत आहे.

दैनिक गोमन्तक

Shoaib Malik Viral Video: पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज शोएब मलिक सध्या चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक लवकरच घटस्फोट घेऊ शकतात, मात्र दोघेही या विषयावर उघडपणे काही बोललेले नाहीत. या सगळ्यामध्ये शोएब मलिकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लाइव्ह शोमध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

शोएब मलिक LIVE शोमध्ये डान्स करत आहे

T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा (New Zealand) पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या या मोठ्या विजयानंतर जल्लोषाचे वातावरण आहे, अशा स्थितीत पाकिस्तानच्या ए स्पोर्ट्स चॅनलवर एक्सपर्ट्स म्हणून सहभागी झालेल्या शोएब मलिकने संघाच्या विजयानंतर जबरदस्त डान्स केला. हा सामना संपताच तो स्टुडिओमध्येच भांगडा करताना दिसला.

वसीम-वकारनेही विजय साजरा केला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये माजी क्रिकेटपटू वकार युनूस, वसीम अक्रम आणि मिसबाह उल हक देखील दिसत आहेत. पाकिस्तानच्या (Pakistan) विजयानंतर हे दिग्गज नाचतानाही दिसले. हे सर्व दिग्गज खेळाडू एक्सपर्ट्स म्हणूनही या वाहिनीशी जोडलेले आहेत. त्याचवेळी, शोएब मलिकला (Shoaib Malik) 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघात स्थान मिळू शकले नाही.

शोएब मलिकने 2010 मध्ये लग्न केले

सानिया मिर्झाने (Sania Mirza) 2010 मध्ये हैदराबादमध्ये शोएब मलिकशी लग्न केले. सानिया मिर्झाने टेनिस विश्वात भारताचे नाव उंचावले आहे, तर शोएब मलिक हा पाकिस्तानमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. पण सोशल मीडियावर आता या दोघांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत, बातम्यांनुसार दोघेही घटस्फोट घेणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT