Sania Mirza Shoaib Malik Marriage: माझिया प्रियाला प्रीत कळेना! सानियाच्या 12 वर्षांच्या संसाराला लागली नजर

Sania Mirza Shoaib Malik Marriage in Trouble: सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या वैवाहिक जीवन अफवांमुळे धोक्यात येउ शकते.
Sania Mirza And  Shoaib Malik
Sania Mirza And Shoaib Malik Dainik Gomantak

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांना पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. वर्षानुवर्षे हे जोडपे त्यांच्या लव स्टोरी लोकांना भुरळ घालत आहे. त्यांना एक एक मूल देखिल आहे. इझाहान मिर्झा मलिक असे त्याचे नाव आहे. शोएब आणि सानियाने 2010 मध्ये लग्नबंधनात अडकले. अनेक वर्षांपासून हे जोडपे दूर राहूनही त्यांचे प्रेम टिकून आहे. परंतू नुकत्याच आलेल्या बातम्यांनुसार दोघांचे लग्न नजर लागली आहे. असा दावा पाकिस्तानी मीडियामध्ये (Media) ला जात असून या बातमीने खळबळ उडाली आहे.

तुम्हाला आठवत असेल तर 2010 मध्ये या लग्नात बराच गोधळ झाला होता आणि याच दरम्यान दुसऱ्या एका महिलेने शोएबवर तिच्याशी पहिले लग्न केल्याचा आरोप केला होता. पण याचा परिणाम सानिया आणि शोएबच्या लग्नावर झाला नाही. पाकिस्तानी मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांनुसार, सानिया मिर्झा आणि शोएब मलिकने नुकताच त्यांचा मुलगा इझाहानचा वाढदिवस एकत्र साजरा केला. शोएब मलिकने त्याचा फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला पण सानियाने तिच्या इंस्टाग्रामवर पार्टीचे फोटो शेअर केले. पण ती पोस्ट करण्यात आली नाही आणि तेव्हापासून दोघांच्या नात्याला नजर लागली आहे.

View this profile on Instagram

Sania Mirza (@mirzasaniar) • Instagram photos and videos

Sania Mirza And  Shoaib Malik
Ironman 70.3 Goa: रविवारी 'आयर्नमॅन'चा थरार; 70 गोवन ट्रायअ‍ॅथलीटस घेणार सहभाग

पाकिस्तानी मीडियानुसार, काही लोक आरोप करत आहेत की, पाकिस्तानी क्रिकेटरने सानियाची एका शोमध्ये फसवणूक केली, ज्याचे शूटिंग करत होते. टेनिस स्टार सानिया मिर्झा तिच्या सोशल मीडियावर वाईट काळाबद्दल पोस्ट शेअर करत राहिल्याने या अफवांना अधिकच उधाण आले आहे. यासोबतच या शुक्रवारी तिने इझाहनसोबतचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, 'ते क्षण जे मला सर्वात कठीण दिवसांमधून बाहेर काढतात.' या प्रकरणी अद्याप सानिया मिर्झा किंवा शोएब मलिककडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com