Sandeep Lamichane  Dainik Gomantak
क्रीडा

Nepal च्या 'या' क्रिकेटपटूने रचला नवा रेकॉर्ड, रशीद खान आणि मिचेल स्टार्क बघतच राहिले!

Sandeep Lamichane: दरम्यान, आयपीएलमध्ये खेळलेल्या नेपाळच्या एका क्रिकेटपटूने एक अनोखा विक्रम केला आहे.

Manish Jadhav

Fastest Bowler To Pick 100 Wickets In ODIs Sandeep Lamichane: आयपीएल 2023 चा हंगाम सध्या सुरु आहे. तसे, जेव्हा भारतात आयपीएल खेळले जाते तेव्हा जगात फारसे क्रिकेट खेळले जात नाही.

आयपीएलमध्ये रोज नवे-नवे रेकॉर्ड बनतात आणि मोडतात. दरम्यान, आयपीएलमध्ये खेळलेल्या नेपाळच्या एका क्रिकेटपटूने एक अनोखा विक्रम केला आहे.

जे काम जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज राशिद खान आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क, जो आपल्या अचूक गोलंदाजीसाठी ओळखला जातो, ते करु शकले नाहीत.

तेच काम नेपाळचा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछाने याने केले आहे. तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 100 विकेट्स घेण्याचा पराक्रम संदीप लामिछानेने केला आहे.

संदीप लामिछानेने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी पूर्ण केले

संदीप लामिछानेने केवळ 42 एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेटचे शतक पूर्ण केले आहे, म्हणजेच त्याने 100 बळी पूर्ण केले आहेत. जे सर्वात वेगवान आहे.

याआधी हा विक्रम राशिद खानच्या (Rashid Khan) नावावर होता, ज्याने 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 बळी घेतले होते. तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आहे, ज्याने 52 सामन्यात 100 विकेट्स घेतल्या आहेत.

या यादीतील टॉप 3 च्या पुढे गेलो तर पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकने 53 सामन्यात 100 विकेट घेतल्या. न्यूझीलंडच्या शेन बॉडने 54 सामन्यांमध्ये आणि बांगलादेशच्या मुस्तफिझूर रहमानने 54 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.

संदीपने 100 बळी पूर्ण करण्यापूर्वी फलंदाजी करत 10 चेंडूत आठ धावा केल्या. ओमानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय सामन्यात संदीप लामिछानेने हे काम केले.

नेपाळ आणि ओमान यांच्यात एकदिवसीय सामना खेळला जात आहे

संदीप लामिछानेने हे काम त्याचवेळी केले जेव्हा त्याने आपल्या संघासाठी चार षटके पूर्ण केली होती. या चार षटकांत त्याने 12 धावा दिल्या आणि तीन बळी घेतले.

तत्पूर्वी, नेपाळ (Nepal) संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत आठ विकेट्सच्या मोबदल्यात 310 धावा केल्या. यामध्ये कुशल मल्लाने 108 धावा केल्या.

या 108 धावांसाठी त्याने केवळ 64 चेंडू खेळले. त्याच्या बॅटमधून दहा षटकार आणि नऊ चौकार आले. याशिवाय, सोमपालने 48 चेंडूत 63 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Accident: अतिवेगामुळे राज्‍यात दरमहा सरासरी 19 जणांचा मृत्‍यू! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची राज्‍यसभेत माहिती

खून प्रकरणात जन्मठेप भोगणारे तिघे ठरले निर्दोष, सत्र न्‍यायालयाचा निर्णय खंडपीठाने बदलला

Goa Nightclub Fire: लुथरा बंधूंना झटका; अंतरिम जामीन नाकारला, दिल्लीच्या राेहिणी न्यायालयाचा निर्णय

Goa Nightclub Fire: प्रसंगी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांवरही होईल कारवाई, क्‍लबमधील आगीनंतर कडक पावले

Goa Nightclub: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर; कळंगुट, बागात जागा मिळेल तेथे क्‍लब, सामान्य नागरिक हैराण!

SCROLL FOR NEXT