IPL 2023: अखेर दिल्ली जिंकली रे! कोलकाता नाईट रायडर्सचा 4 गडी राखून केला पराभव

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 गडी राखून पराभव केला आहे.
Delhi Capitals
Delhi Capitals Dainik Gomantak
Published on
Updated on

IPL 2023: आयपीएल 2023 च्या 28 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 4 गडी राखून पराभव केला. सलग पाच पराभवानंतर आयपीएल 2023 मधील दिल्ली कॅपिटल्सचा हा पहिला विजय आहे.

त्याचबरोबर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सलग तिसरा पराभव झाला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 षटकांत सर्व गडी गमावून 127 धावा केल्या.

प्रत्युत्तरात डेव्हिड वॉर्नरच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने 4 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.

दरम्यान, 128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि शॉ यांनी दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी झाली. निराशाजनक खेळी खेळल्यानंतर पृथ्वी शॉ बाद झाला. त्याने 11 चेंडूत 13 धावा केल्या.

Delhi Capitals
IPL 2023: पीटरसनकडून केएल राहुलचा अपमान? ऑन-एयर म्हणाला, 'त्याची फलंदाजी पाहाताना...'

तर, मिचेल मार्श आणि वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 24 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, राणाने मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला केवळ दोन धावा करता आल्या.

फिलिप साल्टही 5 धावा करुन बाद झाला. यानंतर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक पूर्ण केले. पण तो 41 चेंडूत 57 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. खराब शॉट खेळून मनीष पांडे बाद झाला. पांड्याने 23 चेंडूत 21 धावा केल्या.

दुसरीकडे, पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संघ 20 षटकांत सर्व गडी गमावून केवळ 127 धावाच करु शकला. कोलकाता संघ या सामन्यात 4 बदलांसह उतरला, तरीही फलंदाजीची कामगिरी निराशाजनक झाली.

कोलकाताकडून सलामीवीर जेसन रॉयने सर्वाधिक 43 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) इशांत शर्मा, एनरिक नोरखिया, अक्षर आणि कुलदीप यादव यांनी 2-2 बळी घेतले.

Delhi Capitals
IPL 2023: लखनऊचा कॅप्टन केएल राहुललाही झाला लाखोंचा दंड, जाणून घ्या कारण

तसेच, पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची पुन्हा एकदा खराब सुरुवात झाली. पॉवरप्लेमध्येच संघाने तीन विकेट गमावल्या होत्या. लिटन 4 आणि राणा 4 धावा करुन बाद झाले.

गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या व्यंकटेश अय्यरला खातेही उघडता आले नाही. मनदीप 12 धावा करुन बाद झाला. रिंकू सिंगलाही काही कमाल दाखवता आली नाही.

तो 8 चेंडूत केवळ 6 धावा करुन बाद झाला. सुनील नरेनने 40 धावांचे योगदान दिले. तर जेसन रॉय 39 चेंडूत 43 धावा करुन बाद झाला.

यानंतर, आंद्रे रसेल लढत राहिला. परंतु दिल्लीच्या गोलंदाजांसमोर त्याला मोठे फटके मारता आले नाहीत. मात्र, अखेरच्या षटकात त्याने लागोपाठच्या चेंडूंवर तीन षटकार ठोकले.

रसेलने 31 चेंडूत 38 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. या खेळीत त्याने 4 षटकार आणि 1 चौकार लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com