Sakshi Malik  Dainik Gomantak
क्रीडा

''सरकारशी भांडण नाही, मला फक्त खेळाडूंची काळजी...'', कुस्ती संघटनेच्या निलंबनावर साक्षी मलिक म्हणाली

WFI President Sanjay Singh Suspended: क्रीडा मंत्रालयाने WFI च्या नवीन अध्यक्षांवर मोठी कारवाई केली. क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांची मान्यता रद्द केली.

Manish Jadhav

WFI President Sanjay Singh Suspended: क्रीडा मंत्रालयाने WFI च्या नवीन अध्यक्षांवर मोठी कारवाई केली. क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांची मान्यता रद्द केली. बृजभूषणशरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह WFI चे अध्यक्ष झाल्याबद्दल कुस्तीपटू सातत्याने नाराजी व्यक्त करत होते. कुस्ती महासंघाच्या निवडणुक निकालाच्या पाश्वभूमीवर साक्षी मलिकने घेतलेल्या पत्रकार परिषदेत शूज काढून टेबलावर ठेवले होते आणि कुस्ती सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. यातच आता, क्रिडा मंत्रालयाच्या या निर्णयानंतर साक्षीची प्रतिक्रीया आली आहे.

क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित संघटनेला निलंबित केले

दरम्यान, मंत्रालयाने रविवारी नवनिर्वाचित असोसिएशनला निलंबित केल्यावर माजी कुस्तीपटू साक्षी मलिकची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सरकारशी भांडण नाही, ही लढाई फक्त खेळाडूंसाठी होती. मला खेळाडूंची काळजी वाटते, असं साक्षी म्हणाली.

मला अद्याप लेखी काहीही मिळालेले नाही: साक्षी मलिक

याबाबत रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना साक्षी मलिक म्हणाली की, "मला अद्याप लेखी काहीही मिळालेले नाही. फक्त संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे की संपूर्ण बॉडीला निलंबित करण्यात आले आहे, हे मला माहीत नाही. आमचा लढा सरकारशी नव्हता. आम्ही फक्त महिला कुस्तीपटूंसाठी लढतोय. मी माझी निवृत्ती जाहीर केली आहे, पण आगामी कुस्तीपटूंना न्याय मिळावा अशी माझी इच्छा आहे."

गोंडा येथे चॅम्पियनशिप का आयोजित करण्यात आली होती, ब्रिजभूषण यांनी हे उत्तर दिले

दुसरीकडे, भाजप खासदार आणि माजी कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषणशरण सिंह यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. गोंडा येथे कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ''प्रत्येक महासंघातील लोकांनी हात वर केले की आम्ही ते चालवू शकत नाही. 15-20 वर्षांच्या मुलांचे भविष्य खराब होऊ नये, यासाठी ही स्पर्धा नंदनी नगरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ही स्पर्धा चार दिवसांत होणार होती. मात्र देशातील 25 पैकी 25 महासंघांनी हात वर केले. ही स्पर्धा 31 डिसेंबरपर्यंत होणार होती.''

अशी मागणी सरकारकडे केली

WFI चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषणशरण सिंह पुढे म्हणाले की, 'आमच्याकडे नंदिनी नगरमध्ये सर्व पायाभूत सुविधा आहेत. याला सर्व महासंघांनी संमती दिली होती. तरीही मी सरकारला विनंती करतो की ही स्पर्धा त्यांच्या देखरेखीखाली घ्यावी. मी गेल्या 12 वर्षात केलेल्या कामाच्या आधारे माझे मूल्यमापन केले जाईल. मी कुस्तीतून निवृत्ती घेतली आहे. आता हे निवडून आलेले लोक त्यांचा निर्णय घेतील. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मला तयारी करायची आहे. आता जे नवे फेडरेशन येणार आहे ते ठरवेल की कोर्टात जायचे की सरकारशी बोलायचे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT