WFI President Sanjay Singh Suspended: क्रीडा मंत्रालयाने WFI च्या नवीन अध्यक्षांवर मोठी कारवाई केली. क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांची मान्यता रद्द केली आहे. बृजभूषणशरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह WFI चे अध्यक्ष झाल्याबद्दल कुस्तीपटू सातत्याने नाराजी व्यक्त करत होते. याच कारणामुळे साक्षी मलिकनेही कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती. आता डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षांवर मोठी कारवाई करत क्रीडामंत्र्यांनी संजय सिंहसह संपूर्ण नवीन बॉडी रद्द केली आहे. अशा परिस्थितीत संजय सिंह यांच्यासह नियुक्त झालेल्या सर्व नवीन सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच संजय सिंह यांचे सर्व निर्णयही स्थगित करण्यात आले आहेत.
दरम्यान, संजय सिंह यांची दोन दिवसांपूर्वीच WFI चे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. अध्यक्ष होताच कुस्तीपटूंचा संताप शिगेला पोहोचला होता. संजय सिंह अध्यक्ष होताच साक्षी मलिकने पत्रकार परिषद घेत कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला होता. संजय सिंह कुस्ती संघटनेचे अध्यक्ष राहिल्यास मी कुस्ती खेळू शकणार नाही, असे साक्षीने अश्रू ढाळत म्हटले होते. असे म्हणत साक्षी मलिकने कुस्ती सोडली. यानंतर बजरंग पुनियाने तिच्या समर्थनार्थ उतरुन पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. कुस्तीपटूंचा हा संताप इथेच थांबला नाही आणि कुस्तीपटू वीरेंद्र सिंगनेही कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ पुढे येत पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचं म्हटलं आहे.
संजय सिंह WFI चे अध्यक्ष बनताच त्यांनी उत्तर प्रदेशातील गोंडा येथे अंडर-15 आणि अंडर-20 राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्यादृष्टीने तयारीही सुरु झाली होती. पण दरम्यान, क्रीडा मंत्रालयाने मोठी कारवाई करत संजय सिंहसह संपूर्ण नवीन बॉडी रद्द केली. यासोबतच संजय सिंह यांनी घेतलेले सर्व निर्णयही रद्द करण्यात आले आहेत. कुस्तीपटूंसाठी हा मोठा विजय आहे. कुस्तीपटू सातत्याने त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी करत होते, आता क्रीडा मंत्रालयाने कुस्तीपटूंचे म्हणणे ऐकून घेतले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.