India vs Kuwait Dainik Gomantak
क्रीडा

India vs Kuwait: भर मैदानात राडा! भारताच्या कोचसह 'या' दोन खेळाडूंनाही रेड कार्ड, पाहा व्हिडिओ

India vs Kuwait Video: SAAF चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारत विरुद्ध कुवेत सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये भांडण झाल्याचे दिसले.

Pranali Kodre

SAFF Championship India vs Kuwait, Three Red Cards: भारत आणि कुवेत यांच्यातील दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) चॅम्पियनशिपमधील सामना मंगळवारी (28 जून) बरोरीत सुटला. पण, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याप्रमाणेच या सामन्यातही खेळाडूंमधील भांडणे पाहायला मिळाली. या सामन्यात एकूण 3 रेड कार्ड दाखवण्यात आले.

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांना या स्पर्धेत दुसऱ्यांदा रेड कार्ड दाखवण्यात आले आहे. त्यांना पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही रेड कार्ड दाखवण्यात आले होते, ज्यामुळे त्यांना नेपाळविरुद्धच्या सामन्यात सहभागी होता आले नव्हते.

दरम्यान कुवेत विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात स्टिमॅक यांच्याशिवाय भारताचा फॉरवर्ड रहिम अलीला आणि कुवेतच्या अल खलाफला रेड कार्ड मिळाले.

या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघात चढाओढ सुरू होती. पण तरी पहिल्या हाफमध्ये सामना अटीतटीचा झाला होता. तरी पहिल्या हाफच्या भरपाई वेळेत भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. हीच आघाडी कायम ठेवण्यासाठी भारतीय संघ दुसऱ्या हाफमध्ये प्रयत्नशील होता.

मात्र, दुसऱ्या हाफमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. सामन्याच्या 64 व्या मिनिटाला स्टीमॅक यांनी खेळात हस्तक्षेप करत बॉल उचलला. त्यामुळे त्यांना यलो कार्ड दाखवण्यात आले होते. पण त्यानंतर सामना संपण्यासाठी 10 मिनिटेच राहिले असताना साईडलाईन्सवर स्टीमॅक यांच्या अतीआक्रमकतेमुळे त्यांना रेड कार्ड दाखवण्यात आले.

त्यानंतर स्टीमॅक यांना बाहेर व्हावे लागले. पण त्यानंतरही नाट्य थांबले नाही. काही वेळातच अल खलाफने सहल अब्दुल सामदला धक्का देत खाली पाडले, ते पाहून लगेचच रहिम अलीनेही अल खलाफला धक्का देत खाली पाडले.

त्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये काही वाद पाहायला मिळाले, अखेर रेफ्रीने अल खलाफ आणि रहिम अली या दोघांनाही रेड कार्ड दाखवत बाहेर पाठवले.

या वादानंतर भारताच्या अन्वर अलीकडून भरपाई वेळेत चूक झाली आणि त्याने स्वंयगोल केला. त्यामुळे सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला.

दरम्यान, हा सामना बरोबरीत सुटल्याने ग्रुप एमध्ये गोल फरकामुळे कुवेतने अव्वल क्रमांक मिळवला आहे. तसेच भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पण उपांत्य सामन्यात भारताला स्टीमॅक यांच्याशिवाय खेळावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाण्याच्या बाटलीवरून 'महाभारत'! निजामुद्दीन स्टेशनवर विक्रेत्यांमध्ये तुफान हाणामारी; रेल्वेनं ठोठावला 5 लाखांचा दंड

Virat Kohli: किंग कोहलीला दिसला वर्ल्ड कप फायनलचा 'फ्लॅशबॅक'; ऑस्ट्रेलियात सरावादरम्यान चाहत्यांची धडधड वाढली, पाहा VIDEO!

Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

Surya Gochar Horoscope: सूर्य तूळ राशीत! 'या' 3 राशींच्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात मोठे बदल; राहा सावध

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT