Saff Championship 2023: सैफ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय फुटबॉल संघाने पाकिस्तानचा 4-0 असा पराभव करुन विजयी सुरुवात केली. श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने भारतासाठी हॅट्ट्रिक गोल केला.
या गोलसह सुनील छेत्रीने दुसऱ्या आशियाई आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूच्या विक्रमाची बरोबरी केली. तर उदांताने शेवटच्या मिनिटाला गोल केला.
सप्टेंबर 2018 नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा पहिला फुटबॉल सामना होता. पाच वर्षांपूर्वी भारताने SAFF स्पर्धेच्या उपांत्य फेरीत शेजारील देशाचा 3-1 असा पराभव केला होता.
दरम्यान, भारतासाठी सुनील छेत्रीने 10 व्या मिनिटाला आणि पुन्हा 16 व्या मिनिटाला गोल केले. उत्तरार्धात सुनीलने 74 व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर 81व्या मिनिटाला उदांता सिंगने गोल केला. या सामन्यात पाकिस्तान (Pakistan) संघाला एकही गोल करता आला नाही.
दुसरीकडे, पहिला फाच्या अखेरीस, भारतीय प्रशिक्षक इगोर इस्टीमाक आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये वाद झाला. पाकिस्तानचा अब्दुल्ला इक्बाल जेव्हा थ्रो-इनची तयारी करत होता, तेव्हा प्रशिक्षक इस्टीमाक यांनी हस्तक्षेप केला.
इस्टीमाक यांनी खेळाडूकडून चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, ज्याचा पाकिस्तानी खेळाडू आणि कोचिंग स्टाफने विरोध केला. त्यानंतर, पंच प्रज्वल छेत्री आणि इतर सामना अधिकाऱ्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.
इस्टीमाक यांना फुटबॉलच्या (Football) नियमांनुसार जाणूनबुजून अडथळा आणल्याबद्दल रेड कार्ड दाखवण्यात आले. यानंतर संपूर्ण मॅचमध्ये इस्टीमाक यांना तिथे उभे राहता आले नाही.
तसेच, SAFF चॅम्पियनशिपचा 14 वा हंगाम आहे. संघांचे दोन ग्रुप केले आहेत. अ गटात भारत कुवेत, नेपाळ आणि पाकिस्तानसोबत आहे. तर ब गटात लेबनॉन, मालदीव, भूतान आणि बांगलादेशचा समावेश आहे. भारताने आठ वेळा सैफ कप विजेतेपद पटकावले आहे, तर चार वेळा उपविजेतेपद पटकावले आहे.
तत्पूर्वी, बुधवारी झालेल्या SAFF फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कुवेतने नेपाळचा 3-1 असा पराभव केला. प्रथमच SAFF चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झालेल्या कुवेतने सुरुवातीच्या मिनिटापासूनच वर्चस्व राखले.
दुसरीकडे, प्रतिआक्रमण करण्यात नेपाळचा संघ अपयशी ठरला. श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात विजयी संघासाठी खालिद अल-इब्राहिम (23वे मिनिट), शाबीब अल खलिदी (41वे मिनिट) आणि मोहम्मद अब्दुल्ला दहम (65वे मिनिट) यांनी गोल केले. नेपाळचा सांत्वन करणारा गोल अंजन बिस्ताने 68 व्या मिनिटाला केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.