India vs Kuwait Football: अन्वर अलीच्या गोलने सामना अनिर्णित, कुवेतची उपांत्य फेरीत धडक!

Saff Championship 2023: भारत आणि कुवेत यांच्यातील दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) चॅम्पियनशिपमधील सामना मंगळवारी अनिर्णित राहिला.
India vs Kuwait Football
India vs Kuwait FootballDainik Gomantak
Published on
Updated on

Saff Championship 2023: भारत आणि कुवेत यांच्यातील दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ (SAFF) चॅम्पियनशिपमधील सामना मंगळवारी अनिर्णित राहिला. टीम इंडियाकडे कुवेतवर वर्चस्व गाजवण्याची संधी होती, पण सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत खेळ फिरला. 45 व्या मिनिटाला कर्णधार सुनील छेत्रीने शानदार गोल करत टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली, मात्र 90 व्या मिनिटाला अन्वर अलीने स्वत:च्याच गोलदपोस्टमध्ये गोल करुन स्कोअर 1-1 अशी बरोबरीत आणला. शेवटच्या क्षणापर्यंत गोलसाठी लढत झाली, मात्र एकाही संघाला गोल करता आला नाही आणि सामना अनिर्णित राहिला.

अन्वर अलीने गोलपोस्टमध्ये गोल केला

आठ मिनिटांच्या इंजरी टाइममध्ये दोन्ही संघ 10-10 खेळाडूंसह खेळत होते. दरम्यान, कुवेतच्या काउंटर अटॅकवर चेंडू क्लिअर करण्यासाठी भारताच्या अन्वर अलीने चेंडू स्वत:च्याच गोलपोस्टमध्ये पाठवला. यासह कुवेतने बरोबरी साधली.

India vs Kuwait Football
SAFF Championship 2023: भारत-पाकिस्तान संघात महामुकाबला! केव्हा, कधी होणार सुरु होणार मॅच, जाणून घ्या सर्वकाही

कुवेतने उपांत्य फेरी गाठली

दुसरीकडे, या ड्रॉनंतर कुवेतने 7 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आणि उपांत्य फेरी गाठली. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताने 7 गुणांसह आधीच उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय संघाने नेपाळला हरवून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत कुवेतचा सामना मालदीव किंवा बांगलादेशशी होईल.

India vs Kuwait Football
Saff Championship: SAF चॅम्पियनशिपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय, पाकिस्तानपाठोपाठ नेपाळलाही चारली धूळ

तसेच, हा सामना बंगळुरुच्या कांतीरवा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सुनील छेत्रीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 92 वा गोल केला. यावेळी आयपीएल स्टार यशस्वी जैस्वालही मॅच एन्जॉय करताना दिसला. त्याने टाळ्या वाजवून टीम इंडियाचा उत्साह वाढवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com