Sachin Tendulkar On Vaibhav Sooryavanshi Dainik Gomantak
क्रीडा

Sachin Tendulkar On Vaibhav Sooryavanshi: 'घाई करू नका...' 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट डेब्युबाबत सचिन तेंडुलकर असं का म्हणाला?

Vaibhav Sooryavanshi test debut Sachin Tendulkar: आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या अद्भूत फलंदाजीने क्रिकेट जगताला थक्क करणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावाची सध्या क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Sameer Amunekar

आयपीएल २०२६ च्या हंगामात आपल्या अद्भूत फलंदाजीने क्रिकेट जगताला थक्क करणाऱ्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावाची सध्या क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने केलेल्या धमाकेदार कामगिरीनंतर, हा युवा खेळाडू लवकरच भारतीय आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवेल, अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत. या संपूर्ण पार्श्वभूमीवर, क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने वैभवच्या भवितव्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले असून, त्याच्या प्रवासात घाई न करण्याचा सल्ला दिला आहे.

'क्रिकइन्फो ऑनर्स अवॉर्ड्स २०२६' या सोहळ्यात बोलताना सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीचे भरभरून कौतुक केले. सचिनच्या मते, वैभवने आपल्या नैसर्गिक खेळावर विश्वास ठेवावा आणि जसजसा तो पुढे जाईल, तसतसा प्रत्येक अनुभवातून शिकत राहावे.

वैभवला कसोटी क्रिकेटमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त करताना सचिन म्हणाला, "फक्त मीच नाही, तर प्रत्येक क्रिकेटप्रेमीला वैभवला कधी ना कधी भारतासाठी कसोटी खेळताना पाहायचे आहे. पण, सध्या चाहत्यांनी संयम राखायला हवा आणि त्याच्या निवडीचा निर्णय निवडकर्त्यांवर सोडायला हवा."

आव्हानांचा सामना आणि सचिनचा मोलाचा सल्ला

कसोटी क्रिकेटमधील आव्हानांबद्दल बोलताना सचिनने सांगितले की, वेळ आणि वाढत्या वयासोबत वैभव प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिकेल. मैदानावरील आव्हानांना तोंड देताना खेळाडूचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक आणि तोडगा काढणारा असायला हवा.

सचिन म्हणाला, "क्रिकेट करिअरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत समस्या व आव्हाने कायम राहतात. गोलंदाज प्रत्येक चेंडूवर तुम्हाला एक प्रश्न विचारत असतो, आता त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही खेळपट्टीवर कसे शोधता, यावरच तुमचे यश अवलंबून असते."

वैभवची 'नॅचरल इन्स्टिंक्ट' आणि तेंडुलकरची दाद

माजी भारतीय कर्णधार सचिन तेंडुलकरने या तरुण डावखुऱ्या फलंदाजाच्या आत्मविश्वासाचे विशेष कौतुक केले. मैदानावर उतरल्यावर वैभव अत्यंत आत्मविश्वासाने खेळतो आणि त्याला काय करायचे आहे याची पूर्ण कल्पना त्याला असते, असे सचिनने नमूद केले.

"मी त्याच्या नैसर्गिक खेळण्याच्या पद्धतीत अजिबात ढवळाढवळ करणार नाही. कारण तो ज्या पद्धतीने चेंडू पाहतो आणि त्यावर जशी प्रतिक्रिया देतो, तीच त्याची खरी ताकद आहे," असे सचिनने आवर्जून सांगितले.

आयपीएल २०२६ मधील ऐतिहासिक कामगिरी

वैभव सूर्यवंशीसाठी आयपीएलचा हा हंगाम ऐतिहासिक ठरला आहे. त्याने संपूर्ण स्पर्धेत तब्बल २३७.३० च्या अद्भूत स्ट्राईक रेटने ७७६ धावा कुटल्या. यादरम्यान त्याने ७२ उत्तुंग षटकार ठोकले आणि २ दिमाखदार शतके झळकावली. या अफाट कामगिरीच्या जोरावर त्याने ५ मोठे पुरस्कार आपल्या नावावर केले. या विक्रमी कामगिरीमुळेच तो सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील सर्वात आश्वासक युवा तारा म्हणून उदयास आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Toll Tax New Rules: टोल प्लाझावर थांबण्याची गरजच नाही! NHAI चा नवा नियम लागू, हायवेवर आता मिळणार 'ट्रॅफिक जाम'पासून मुक्ती

Under 23 Cricket: गोव्याच्या हातात आलेला सामना निसटला? 75 वर 4 बाद असताना हिमाचलची त्रिशतकी मजल!

Ranji Trophy: बिहारवर फॉलोऑनची नामुष्की; गोव्याची 290 धावांची आघाडी, पहिल्या विजयाची चाहूल

IND vs NZ 1st ODI: किंग कोहली बनला 'सुपरमॅन'! हवेत झेप घेत पकडला अफलातून कॅच; कॅप्टन कूलचा मोडला रेकॉर्ड VIDEO

Human Trafficking: पीडित महिलांना दोष नको; मानवी तस्कर, दलाल आणि शोषणाच्या संपूर्ण साखळीवर कारवाई करा – एआरझेड

SCROLL FOR NEXT