Sparrow Conservation: चिमणीच्या अंड्यांसाठी अख्ख्या गावाने 35 दिवस वीज बंद ठेवली! सत्यघटनेवर आधारित 'कूदू'ची इफ्फीत चर्चा

Koodu Tamil Movie True story: चिमणीसाठी गावकऱ्यांनी 35 दिवस वीज बंद ठेवल्याच्या घटनेतून या चित्रपटाची प्रेरणा मिळाली.
Sparrow Conservation
Sparrow ConservationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ट्रान्सफॉर्मरमधील चिमणीची अंडी सुरक्षित राहावीत म्हणून तमिळनाडूतील एका गावाने सलग ३५ दिवस वीज बंद ठेवल्याच्या सत्यघटनेवर आधारित ‘कुदू’ (घरटे) हा तमिळ चित्रपट इफ्फीच्या ‘गाला प्रीमियर’ विभागात सादर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अगथियन यांच्याकडे पाच वर्षांहून अधिक काळ असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केल्यानंतर ‘कुदू’द्वारे स्वतंत्र दिग्दर्शनात पदार्पण करणारे जोएल विजय यांनी सांगितले की, हा चित्रपट तमिळनाडूतील शिवगंगा परिसरातील पोथ्थाकुडी गावातील एका खऱ्या घटनेवर आधारित आहे. चिमणीसाठी गावकऱ्यांनी ३५ दिवस वीज बंद ठेवल्याच्या घटनेतून या चित्रपटाची प्रेरणा मिळाली.

Sparrow Conservation
Goa Short Films IFFI: 24 तासांत बनवला लघुपट, 19 वर्षांच्या दिग्दर्शकाचीही कमाल; इफ्फीत गोव्याच्या तरुणाईचा ठसा

ही पृथ्वी केवळ माणसांसाठी नसून सर्व सजीवांना येथे जगण्याचा समान अधिकार आहे, हा या चित्रपटाचा गाभा असल्याचे विजय यांनी सांगितले. हा संदेश गंभीर किंवा उपदेशात्मक न ठेवता दैनंदिन प्रसंग आणि विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख अभिनेते विजय जयप्रकाश यांनी सांगितले की, नोंदणी कार्यालयात (रजिस्ट्रार ऑफिस) आपल्या क्रमांकाची वाट पाहत असताना त्यांना या चित्रपटाची कथा सांगण्यात आली. कथा साधी, ग्रामीण भागातील आणि सत्यघटनेवर आधारित असल्याने अवघ्या दहा मिनिटांत आपण होकार दिला. वीजकपातीमुळे येणाऱ्या दैनंदिन अडचणींवर गावात चर्चा सुरू असताना ज्यांच्या शब्दाला वजन आहे, अशा गावप्रमुखाची भूमिका त्यांनी साकारली आहे.

निर्माते एम. गणेश आणि राजेश मेनन यांनीही चित्रपटाच्या निर्मितीबाबत भूमिका मांडली. ‘पॅनोरमा’मध्ये चित्रपट पाहिल्यानंतर त्यातील संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचायला हवा, असे वाटल्याने पॅनोरमा स्टुडिओज या प्रकल्पाशी जोडले गेलो आणि चित्रपट पूर्ण करण्यासाठी साथ दिली, असे मेनन यांनी सांगितले.

Sparrow Conservation
Goa Politics: 'मी योग्य तेच केले, निर्णय मतदार घेतील'; मनोज परब यांच्या आरोपांवर बोरकरांचा पलटवार

प्रदूषणाचा पक्ष्यांवर परिणाम

या चित्रपटात निलगिरी ब्लू बर्ड या पक्ष्याच्या प्रजातीचा उल्लेख केला आहे. या प्रजातीच्या संवर्धनासाठी सुरू असलेले प्रयत्न तसेच भारतीय टपाल विभागाने या पक्ष्याच्या सन्मानार्थ जारी केलेल्या टपाल तिकिटाचा संदर्भ विजय यांनी दिला. या पक्ष्याचे चित्रण प्रभावीपणे करण्यासाठी थ्रीडी व व्हीएफएक्स तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. शहरांमधील वाढता गोंगाट व प्रदूषण यांमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक आवाज कमी होत आहेत. मानवी जीवनशैलीचा पक्ष्यांच्या अधिवासावर व त्यांच्या नैसर्गिक अस्तित्वावर होणारा परिणामही त्यांनी यावेळी अधोरेखित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.