MS Dhoni | Sachin Tendulkar  Dainik Gomantak
क्रीडा

Double Century: 24 फेब्रुवारी अन् डबल धमाका! सचिन, धोनीसह तीन क्रिकेटरची एकाच दिवशी द्विशतके

क्रिकेटमध्ये 24 फेब्रुवारी हा खास दिवस असून या दिवशी विविध वर्षी तीन खेळाडूंनी द्विशतके झळकावली आहेत.

Pranali Kodre

Cricket Double Hundred: क्रिकेटमध्ये शतक करणे ही मोठी गोष्ट, मग त्यातही द्विशतक म्हणजे सोन्याहून पिवळं. पण 24 फेब्रुवारी हा असा दिवस आहे, ज्यादिवशी एक नाही, दोन नाही, तर तीन खेळाडूंच्या नावावर वेगवेगळ्या वर्षात द्विशतकं नोंदवली गेली.

यामध्ये भारताच्या सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांच्यासह वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचाही समावेश आहे. या तिघांनीही ही द्विशतके करताना मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली. त्यांच्याच द्विशतकांबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

सचिन तेंडुलकर

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 24 फेब्रुवारी 2010 रोजी भारताकडून खेळताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सामन्यात शतकी खेळी केली होती. ग्वाल्हेरला झालेल्या या वनडे सामन्यात सचिनने 147 चेंडूत 25 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 200 धावांची खेळी केली होती.

त्यामुळे तो पुरुष वनडे क्रिकेट इतिहासात द्विशतकी खेळी करणारा पहिलाच खेळाडू ठरला होता. त्याच्या या शतकामुळे भारताने 401 धावा उभारताला दक्षिण आफ्रिकेला 402 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका 248 धावांवर सर्वबाद झाले होते. दरम्यान, सचिनची ही खेळी वनडे क्रिकेटमधील ऐतिहासिक खेळी ठरली.

एमएस धोनी

ऑस्ट्रेलियाचा संघ 2013 साली भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात चेन्नई येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 22 ते 26 फेब्रुवारी 2013 दरम्यान कसोटी सामना झाला होता. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी तत्कालिन भारतीय कर्णधार एमएस धोनी पहिल्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने याच दिवशी शतकच नाही, तर द्विशतकही पूर्ण केले.

त्यामुळे तो कसोटीत द्विशतक करणारा भारताचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज ठरला होता. आजही 10 वर्षांनंतर हा विक्रम धोनीच्याच नावावर आहे. तो सामन्याच्या चौथ्या दिवशी 224 धावांवर बाद झाला होता. त्याने ही खेळी 265 चेंडू करताना 24 चौकार आणि 6 षटकार मारले होते.

तसेच विराट कोहलीबरोबर 5 व्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली होती. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमारबरोबर 9 व्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी केली होती. या सामन्यात भारताने पुढे जाऊन 8 विकेट्सने विजय मिळवला. धोनी या सामन्यातील सामनावीर ठरला होता.

ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा आक्रमक सलामीवीर ख्रिस गेलने अनेकदा प्रतिस्पर्ध्यांना तडखा देणाऱ्या खेळी केल्या आहेत. यातीलच एक खेळी म्हणजे साल 2015 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्ध केलेले द्विशतक. त्याने या सामन्यात 138 चेंडूतच द्विशतक केले होते. त्यावेळी तो वनडेत सर्वात जलद द्विशतक करणारा खेळाडू ठरला होता. तसेच वनडे वर्ल्डकपमध्ये द्विशतक करणाराही तो पहिला खेळाडू ठरला.

त्याने या सामन्यात 147 चेंडूत 10 चौकार आणि 16 षटकारांसह 215 धावांची खेळी केली होती. तो डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद झाला होता. त्याने मार्लन सॅम्युएल्सबरोबर तब्बल 372 धावांची भागीदारी केली होती. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने नंतर डकवर्थ लुईस नियमानुसार 73 धावांनी विजय मिळवला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT