Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टरचा 'रोमँटिक' अंदाज पाहिलाय का? पत्नीबरोबरचा Video तुफान व्हायरल

सचिनचा पत्नीबरोबरचा रोमँटिक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Sachin and Anjali Tendulkar
Sachin and Anjali Tendulkar Dainik Gomantak

Sachin Tendulkar: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानात केलेल्या मोठमोठ्या विक्रमांमुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. तसेच तो निवृत्तीनंतर आता सोशल मीडियावरही बराच सक्रिय असतो. त्यामुळे त्याचे अनेक पोस्ट देखील बऱ्याचदा चर्चेत राहातात. अशीच त्याने नुकतीच केलेल्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

या पोस्टमध्ये त्याचा रोमँटिक अंदाज दिसला आहे. सचिन फार क्वचितच त्याची पत्नी अंजलीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचमुळे त्याने नुकताच अंजलीबरोबरचा सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे.

Sachin and Anjali Tendulkar
Sachin-Arjun: केवळ सचिन-अर्जुनच नाही, तर या भारतीय पिता-पुत्रांच्या जोडीनेही ठोकलेलं पदार्पणात शतक

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की तो एका रेस्टॉरंटमध्ये बसला आहे. तसेच त्याच्या हातात एक प्लेट असून त्यावर लिहिले आहे की 'एका घासने तुम्ही कोणाला भेटाल हे तुम्हाला कधीच कळत नाही. (You never know who you'll meet over a slice)'.

त्यानंतर कॅमेरा अंजलीच्या चेहऱ्यावर जातो. त्यावेळी अंजली सचिनच्या विरुद्ध दिशेला बसलेली दिसते. तसेच जेव्हा तिच्याकडे कॅमेरा येतो, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसते.

सचिन-अंजलीच्या या रोमँटिग व्हिडिओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. तसेच या व्हिडिओवर अनेक कमेंट्सही आल्या आहेत.

सचिन आणि अंजली यांच्या लग्नाला आता २७ वर्षे होऊन गेली आहेत. या दोघांची लव्हस्टोरी विमानतळावर सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधन त्यांच्या नात्याला नाव दिले. आता हे दोघेही सुखी संसार करत असून त्यांना सारा आणि अर्जुन ही दोन मुलेही आहेत.

सारा वैद्यकिय क्षेत्राचे शिक्षण घेत आहे. महत्त्वाचे म्हणजे अंजली देखीने पेशाने डॉक्टर आहे. तसेच अर्जुनने सचिनच्याच पावलावर पाऊल ठेवत क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याचे ठरवले आहे.

त्याने नुकतेच गोव्याकडून खेळताना रणजी ट्रॉफी २०२२-२३ हंगामादरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणही केले आहे. विशेष म्हणजे सचिनप्रमाणेच त्याने पदार्पणाच्या रणजी सामन्यातच शतकी खेळी करण्याचाही विक्रम केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com