James Anderson 700 Test Wickets | Sachin Tendulkar PTI and X
क्रीडा

James Anderson @700: 'मैंने बोला था...', कसोटीत सर्वाधिकवेळा बाद केलेल्या अँडरसनवर सचिन तेंडुलकरने उधळली स्तुतीसुमने

Sachin Tendulkar on James Anderson: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या कमालीच्या सातत्याचे आणि त्याच्या यशाबद्दल मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे.

Pranali Kodre

Sachin Tendulkar lauded James Anderson for 700 Test Wickets

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाच सामन्याच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना धरमशाला येथे झाल. या सामन्यात शनिवारी भारताने तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. असे असले तरी हा सामना इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसाठी वैयक्तिकदृष्ट्या अविस्मरणीय ठरला.

अँडरसनने या सामन्यात 700 कसोटी विकेट्सटचा टप्पा पूर्ण केला आहे. त्याबद्दल मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याचे अभिनंदन करताना एक मोठी पोस्ट शेअर केली आहे.

या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात अँडरसनने शुभमन गिलनंतर कुलदीप यादवला बाद केले आणि कारकिर्दीतील 700 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. तो कसोटीमध्ये 700 विकेट्स घेणारा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज आहे, तर एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे.

गेली 22 वर्षे सातत्याने खेळत असलेल्या अँडरसनने 187 व्या कसोटी सामन्यात 700 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याआधी असा विक्रम कसोटी मुथय्या मुरलीधरन (800) आणि शेन वॉर्न (708) यांनी केला आहे, पण हे दोन्ही गोलंदाज फिरकीपटू आहेत.

दरम्यान अँडरसनने केलेल्या या पराक्रमाबद्दल सचिन तेंडुलकरने लिहिले, 'जेव्हा मी पहिल्यांदा अँडरसनला 2002 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळताना पाहिले, तेव्हा त्याचे चेंडूवरील नियंत्रण काहीतरी स्पेशल होते. नासिर हुसेन त्यावेळी त्याचे मोठे कौतुक करायचा आणि आता मला खात्री आहे की तो म्हणेल, 'मैने बोला था', म्हणजे मी आधीच सांगितलं होतं.'

'700 कसोटी विकेट्स हे मोठे यश आहे. एका वेगवान गोलंदाजाने 22 वर्षे खेळावे आणि सातत्याने कामगिरी दाखवत 700 विकेट्स घ्यावेत, ही गोष्ट अँडरसनने खरोखर करून दाखवण्यापर्यंत काल्पनिक वाटत होती. अगदीच कमाल.'

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी सचिनला त्याच्या कारकिर्दीत अँडरसनने बऱ्याचदा सतवले आहे. विशेष म्हणजे सचिनला कसोटीत सर्वाधिक 9 वेळा बाद करण्याचा विक्रमही अँडरसनच्याच नावावर आहे. अँडरसनप्रमाणे अन्य कोणत्याच गोलंदाजाला सचिनला कसोटीत 9 वेळा बाद करता आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa News: कोट्यवधींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी दिले तात्काळ कारवाईची आदेश; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

SCROLL FOR NEXT