IND vs ENG: चाळीशीतही अँडरसनचा जलवा! कुलदीपची विकेट घेत 'हा' भीमपराक्रम करणारा जगातील पहिलाच फास्ट बॉलर

James Anderson 700 Test Wickets: भारताविरुद्ध धरमशाला कसोटीत खेळताना जेम्स अँडरसनने कुलदीप यादवची विकेट घेत आत्तापर्यंत कोणत्याच वेगवान गोलंदाजाला न जमलेला विश्विविक्रम नावावर केला आहे.
James Anderson 700th wicket
James Anderson 700th wicketX/englandcricket
Published on
Updated on

James Anderson first Fast Bowler to take 700 Test Wickets

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा सामना चालू आहे. गुरुवारपासून (7 मार्च)चालू झालेल्या या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा 41 वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने इतिहास रचला.

त्याने भारताच्या पहिल्या डावात कुलदीप यादवला यष्टीरक्षक बेन फोक्सच्या हातून झेलबाद करत कसोटी कारकिर्दीत 700 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. तो कसोटीत 700 विकेट्स घेणारा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. तसेच एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे.

त्याच्यापूर्वी मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न या फिरकीपटूंनी 700 विकेट्स कसोटीत घेतल्या आहेत.मुरलीधरनने 800 विकेट्स घेतल्या आहेत, तर वॉर्नने 708 विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या पाठोपाठ सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जेम्स अँडरसन आहे.

James Anderson 700th wicket
IND vs ENG, Video: कॅप्टन रोहित पाठोपाठ गिलचाही इंग्लंडला शतकी दणका, पाहा दोघांचही सेलिब्रेशन

जेम्स अँडरसनने 2003 साली कसोटीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने आता 187 व्या सामन्यात खेळताना 700 विकेट्सचा टप्पा पार केला.

 कसोटीमध्ये 600 पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये केवळ दोनच वेगवान गोलंदाज आहेत. हे दोन वेगवान गोलंदाज म्हणजे अँडरसन आणि त्याचा बराच काळाचा साथीदार स्टुअर्ट ब्रॉड.

तसेच या यादीत पहिल्या पाचमध्ये भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे देखील आहे. कुंबळेने कसोटीत 619 विकेट्स घेतल्या आहेत.

सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे गोलंदाज (9 मार्च 2024 पर्यंत)

  • 800 विकेट्स - मुथय्या मुरलीधरन (133 सामने)

  • 708 विकेट्स - शेन वॉर्न (145 सामने)

  • 700 विकेट्स - जेम्स अँडरसन (187 सामने)

  • 619 विकेट्स - अनिल कुंबळे (132 सामने)

  • 604 विकेट्स - स्टुअर्ट ब्रॉड (167 सामने)

James Anderson 700th wicket
IND Vs ENG: रविचंद्रन अश्विनच्या नावावर नकोसा रेकॉर्ड; वेंगसरकर आणि पुजारानंतर ठरला तिसरा भारतीय

भारताकडे अडिचशे धावांची आघाडी

या सामन्यात भारताने तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात 120 षटकापासून आणि 8 बाद 473 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती. यावेळी सुरुवातीलाच अँडरसनने कुलदीपला आणि शोएब बशीरने जसप्रीत बुमराहला बाद करत भारताचा डाव संपवला.

भारताने पहिल्या डावात 124.1 षटकात सर्वबाद 477 धावा करत 259 धावांची आघाडी घेतली. तत्पुर्वी इंग्लंडचा संघ २१८ धावांत पहिल्या डावात सर्वबाद झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com