Shoaib Bashir 5 Wickets Haul
Shoaib Bashir 5 Wickets Haul PTI

IND vs ENG: बशीरने भारताविरुद्ध मारला पंजा! आजपर्यंत कोणत्याच इंग्लिंश गोलंदाजाला न जमलेला विक्रम केला नावावर

Shoaib Bashir 5 Wickets: धरमशाला कसोटीत इंग्लंडचा 21 वर्षीय गोलंदाज शोएब बशीरने भारताविरुद्ध 5 विकेट्स घेत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Published on

England Bowler Shoaib Bashir 5 Wickets Haul against India in Dharamsala Test

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना गुरुवारपासून (7 मार्च) धरमशाला येथे सुरू झाला आहे. या सामन्यात इंग्लंडचा 20 वर्षीय शोएब बशीरने पहिल्या डावात ५ विकेट्स घेत मोठा कारनामा केला आहे.

या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांतच संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला होता. भारताच्या पहिल्या पाचही फलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे पहिल्या डावात सर्वबाद 477 धावा करत 259 धावांची आघाडी घेतली.

दरम्यान, मधल्या षटकांमध्ये मात्र इंग्लंडचा फिरकीपटू बशीरने चांगली गोलंदाजी केली. त्यानेच जसप्रीत बुमराहला बाद करत भारताचा डावही संपवला. याबरोबर बशीरने या डावात 5 विकेट्सही पूर्ण केल्या.

Shoaib Bashir 5 Wickets Haul
IND vs ENG, 5th Test: टीम इंडियाला धक्का! कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या दिवशी उतरला नाही मैदानात, BCCI ने दिलं स्पष्टीकरण

बशीरने बुमराहपूर्वी भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना माघारी धाडले होते.

दरम्यान, बशीरने कसोटीत डावामध्ये 5 विकेट्स घेण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी त्याने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतीलच रांचीला झालेल्या चौथ्या कसोटीत पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या.

त्यामुळे तो वयाची 21 वर्षे पूर्ण करण्यापूर्वीच कसोटीत दोन वेळा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

Shoaib Bashir 5 Wickets Haul
IND vs ENG: चाळीशीतही अँडरसनचा जलवा! कुलदीपची विकेट घेत 'हा' भीमपराक्रम करणारा जगातील पहिलाच फास्ट बॉलर

यापूर्वी हिल वोस, जेम्स अँडरसन आणि रेहान अहमद यांनी वयाची 21 वर्षे पूर्ण करण्याआधी कसोटीत प्रत्येकी 1 वेळा डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास पहिल्या डावात भारताकडून शुभमन गिल (110) आणि रोहित शर्मा (103) यांनी शतके केली, तर यशस्वी जयस्वाल (57), सर्फराज खान (56) आणि देवदत्त पडिक्कल (65) यांनी अर्धशतके केली.

तसेच या डावात इंग्लंडकडून बशीरव्यतिरिक्त जेम्स अँडरसन आणि टॉम हार्टली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच कर्णधार बेन स्टोक्सने 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com