Team India Best Fielder BCCI
क्रीडा

IND vs SL: 'बेस्ट फिल्डर आहे...', खुद्द सचिन तेंडुलकरने केली घोषणा, 2003 ची खास आठवणही सांगितली

Team India Best Fielder: वर्ल्डकप 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर खुद्द सचिन तेंडुलकरकडून भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये बेस्ट फिल्डरची घोषणा करण्यात आली.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Sri Lanka, Best Fielder Video:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत गुरुवारी (2 नोव्हेंबर) भारताने श्रीलंकेविरुद्ध 302 धावांनी मोठा विजय मिळवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मिळवलेल्या या मोठ्या विजयानंतर भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये या सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचे पदक कोणाला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. कारण या सामन्यात क्षेरक्षकांनी शानदार क्षेत्ररक्षण केले होते, तसेच ६ झेलही घेतले होते.

अखेर बीसीसीआयने शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. विशेष म्हणजे यंदा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची घोषणा केली. त्याने ही घोषणा करताना २००३ वर्ल्डकपमधील एक खास आठवणही सांगितली. तसेच त्याने अखेरीस श्रेयस अय्यरची सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवड केली.

खरंतर या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येक सामन्यानंतर संघातील एका खेळाडूची क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांच्याकडून सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून निवड करण्याची परंपरा सुरू झाली आहे. तसेच प्रत्येकवेळी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाच्या पदकाच्या विजेत्याची घोषणा वेगवेगळ्या प्रकारे केली जात आहे. 

त्यानुसार यंदा सचिनकडून ही घोषणा करून घेण्यात आली. सचिन श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थितही होता.

दरम्यान, बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की टी दिलीप आधी संघातील खेळाडूंचे चांगल्या कामगिरीसाठी ड्रेसिंग रुममध्ये कौतुक करत आहेत. त्यांनी केएल राहुल, रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर यांच्या क्षेत्ररक्षणाबरोबरच फलंदाजांचेही कौतुक केले.

तसेच त्यानंतर त्यांनी सांगितले की यावेळी सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाची घोषणा दिग्गज सचिन तेंडुलकर करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी टीव्हीवर सचिनचा व्हिडिओ प्ले करण्यात आला.

यावेळी सचिनने संघाचे कौतुक करताना त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्याने सांगितले की ज्याप्रमाणे यावेळी क्षेत्ररक्षकाचे पदक देण्यात येत आहे, तसे २००३ सालच्या वर्ल्डकपवेळी एक चार्ट तयार करण्यात आल्याचेही त्याने सांगितले.

सचिनने सांगितले की 'रोहित मला भेटला आणि त्याने मला क्षेत्ररक्षकाच्या पदकाबद्दल सांगितले. त्यामुळे मला २० वर्षांपूर्वीची आठवण झाली.आम्ही त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत खेळत होतो. आम्ही स्पर्धेपूर्वी एक चार्ट तयार केला होता, त्यात लिहिले होते 'मी करू शकतो, आम्ही करू शकतो.' त्यावेळी मैदानात जाण्यापूर्वी प्रत्येक खेळाडूला त्या चार्टवर स्वाक्षरी करावी लागत होती.'

'हे सर्व वचनबद्धतेबद्दल आहे की मी माझ्या देशासाठी आणि संघासाठी १०० टक्के योगदान देईल. आणि सध्याचा भारतीय संघ क्षेत्ररक्षकाचे पदक देऊन तेच करत आहे.'

दरम्यान, यानंतर सचिनने श्रेयस अय्यरची सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून घोषणा केली. श्रेयसने या सामन्यात दोन झेल घेतले. त्याने एक झेल मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर आणि एक रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर घेतला. तसेच त्याला हे पदक मिळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्याला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यानंतरही हे पदक मिळाले होते.

गुरुवारी झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 बाद 357 धावा केल्या होत्या. त्यानंतर 358 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'कॅश फॉर जॉब प्रकरण'; काँग्रेस युथ पदाधिकाऱ्यांची म्हार्दोळ पोलिस स्थानकावर धडक!

Nagarjuna At IFFI 2024: नागार्जुन यांचा इफ्फीत जलवा! दाखवली नृत्याची झलक; स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाबाबत म्हणाले की..

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: सिनेविश्वातील महिलांच्या सुरक्षेबाबत भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान, 'पॉवर प्ले आहे पण..'

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT