Sachin Tendulkar : 'मी फेडररसारखे कार्लोसलाही 10-12 वर्षे...', मास्टर-ब्लास्टरकडून विम्बल्डन विजेत्याचं तोंडभरून कौतुक

Wimbledon 2023 Final: विम्बल्डन 2023 विजेत्या अल्कारेजवर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्तुतीसुमने उधळली आहेत.
Sachin Tendulkar | Carlos Alcaraz
Sachin Tendulkar | Carlos AlcarazDainik Gomantak
Published on
Updated on

Sachin Tendulkar Praise Carlos Alcaraz: रविवारी स्पेनच्या कार्लोस अल्कारेजने विम्बल्डन 2023 स्पर्धेचे विजेतेपद जिंकत इतिहास रचला. त्याने पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात 23 वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. या विजयानंतर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अल्कारेजचे कौतुक केले.

अव्वल मानांकित अल्कारेजने जोकोविचला 4 तास 42 मिनिट चाललेल्या अंतिम सामन्यात 1-6, 7-6(6), 6-1, 3-6, 6-4 असे पराभूत केले. हे अल्कारेजचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. त्याने यापूर्वी 2022 मध्ये अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकले होते.

Sachin Tendulkar | Carlos Alcaraz
Novak Djokovic: चालू सामन्यातच जोकोविचचा पारा चढला, वैतागून थेट रॅकेटच तोडली, पाहा Video

दरम्यान, अल्कारेजच्या या विजेतेपदानंतर सचिनने ट्वीट केले की 'अंतिम सामना पाहाणे शानदार होते. दोन्ही खेळाडूंनी शानदार टेनिसचे प्रदर्शन केले. आपण टेनिसमधील पुढच्या सुपरस्टारच्या उदयाचे साक्षीदार आहोत. मी कार्लोसची कारकिर्द पुढील 10-12 वर्षे फॉलो करणार आहे, जसे मी रॉजर फेडररची केली. कार्लोस अल्कारेझ खूप अभिनंदन.'

सचिन फेडररचा मोठा चाहता असल्याने अनेकांना माहित असेल. अनेकदा सचिनने फेडररची भेटही घेतली आहे.

दरम्यान अल्कारेजच्या रुपात गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत नोव्हाक जोकोविच, रॉजर फेडरर, अँडी मरे आणि राफेल नदाल यांच्याव्यतिरिक्त विजेता विम्बल्डनला मिळाला आहे. त्यामुळेच अल्कारेजचा हा विजय विशेष मानला जात आहे.

तथापि, या विजयानंतर अल्कारेज जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम राहाणार आहे.

Sachin Tendulkar | Carlos Alcaraz
Wimbledon 2023: अल्कारेज नवा विम्बल्डन विजेता! दिग्गज जोकोविचला थरारक फायनलमध्ये पराभवाचा धक्का

रोमांचक अंतिम सामना

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचने दणक्यात सुरुवात केली होती. पहिल्या सेटमध्ये त्याने अल्कारेजला कोणतीच संधी न देता 6-1 असा सामना आपल्या नावे केला होता. पण त्यानंतर अल्कारेजने दमदार पुनरागमन केले. त्याने दुसऱ्या सेटमध्ये चिवट खेळ करत टायब्रेकमध्ये विजय मिळवला.

त्यानंतर तिसरा सेट त्याने 6-1 असा सहज जिंकला. पण जोकोविचनेही चौथ्या सेटमध्ये आपल्या अनुभवाच्या जोरावर पुनरागमन करण्यात यश मिळवले. त्याने चौथा सेट जिंकत सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये जाईल, याची काळजी घेतली. मात्र, अखेरच्या सेटमध्ये जोकोविचला पुन्हा अल्कारेज भारी पडला आणि त्याने विजेतेपदही जिंकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com