Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

'हीट मॅन केवळ फलंदाजीमुळेच प्लेइंग इलेव्हनमध्ये'!

रोहित शर्माने (Rohit Sharma) जेव्हापासून टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून त्याच्यामध्ये एक नवी ऊर्जा आणि एक वेगळीच विजयाची भूक निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक

रोहित शर्माने जेव्हापासून टीम इंडियाची कमान हाती घेतली आहे, तेव्हापासून त्याच्यामध्ये एक नवी ऊर्जा आणि एक वेगळीच विजयाची भूक निर्माण झाली आहे. टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. (Saba Karim Has Said That Rohit Sharma Is In The Playing XI Only Because Of His Batting)

दरम्यान, गेल्या दोन टी-20 मालिकेबद्दल विचार केल्यास, रोहित शर्माची (Rohit Sharma) कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka) टी-20 मालिकेत रोहित क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही. यातच आता माजी क्रिकेटपटू सबा करीमने रोहीतच्या कामगिरीवर सवाल उपस्थित केला आहे. रोहितने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कारण कर्णधारपद ही त्याच्यासाठी अतिरिक्त जबाबदारी आहे, असे सबा करीमने म्हटले आहे.

माध्यमाशी बोलताना सबा करीम म्हणाली, ''रोहित शर्मा त्याच्या फलंदाजीमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. कर्णधारपद ही अतिरिक्त जबाबदारी आहे. त्याने आपले लक्ष फलंदाजीवरुन हटवू नये. कर्णधार झाल्यानंतर खेळाडू त्यांच्या प्राथमिक गोष्टींमध्ये अपयशी होऊ लागतात, हे आपण अनेकदा पाहिले आहे. आणि हेच घडू नये.''

रोहितला शानदार फलंदाजी करण्याची गरज - साबा करीम

सबा करीमने रोहित शर्माला फलंदाजीमध्ये अजून जास्त मेहनत घ्यावी असा सल्ला सबा करीमने दिला आहे. रोहितच्या कर्णधारपदाची नुकतीच सुरुवात झाली असून, संघासाठी त्याचे फलंदाजीतील योगदान किती महत्त्वाचे आहे, हे लवकरच कळेल, असेही सबा करीमने म्हटले आहे. टी-20 विश्वचषकात रोहितचे योगदान खूप महत्त्वाचे ठरणार आहे, त्यामुळे त्याला त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार असल्याचे देखील यावेळी सबाने म्हटले आहे.

सबा पुढे म्हणाली, 'रोहित शर्माला हळूहळू कळेल की, त्याची ऑस्ट्रेलियातील कामगिरी किती महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियातील मैदाने मोठी आहेत. प्रतिस्पर्ध्यांकडे अव्वल दर्जाचे गोलंदाज असतील. रोहितला त्याच्या फलंदाजीवर मेहनत घ्यावी लागणार आहे.'

रोहित शर्मा खराब फॉर्म

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत रोहित शर्माला 3 सामन्यात केवळ 50 धावा करता आल्या. त्याची सरासरी फक्त 16.66 होती. संपूर्ण मालिकेत त्याला केवळ 3 चौकार आणि 1 षटकार मारता आला. वेस्ट इंडिज (West Indies) मालिकेतही रोहित शर्माला 3 सामन्यात 26 च्या सरासरीने केवळ 78 धावा करता आल्या होत्या. रोहित शर्माला फलंदाजीत शानदार कामगिरी करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे. आता रोहित कर्णधार म्हणून कसोटी मालिका खेळणार आहे. 4 मार्चपासून सुरु होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत रोहितच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT