S. Sreesanth Dainik Gomantak
क्रीडा

S Sreesanth FIR Lodged: श्रीशांत पुन्हा वादात; फसवणूक प्रकरणी एफआयआर दाखल!

S Sreesanth FIR Lodged: भारतीय संघाचा माजी गोलंदाज एस. श्रीशांत पुन्हा एकदा नव्या वादात सापडला आहे. त्याच्यासाठी आता वाद नवा नाहीये.

Manish Jadhav

S Sreesanth FIR Lodged: भारतीय संघाचा माजी गोलंदाज एस. श्रीशांत पुन्हा एकदा नव्या वादात सापडला आहे. त्याच्यासाठी आता वाद नवा नाहीये. आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती.

मात्र, नंतर ती बंदी उठवण्यात आली पण तोपर्यंत त्याचे वय वाढले होते. आता 2007 आणि 2011 च्या विश्वचषक संघाचा भाग असलेला हा स्टार खेळाडू पुन्हा एकदा वादात सापडला आहे. केरळ पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, एस. श्रीशांतसह एकूण तीन जणांवर फसवणुकीचा आरोप आहे. ही बाब एप्रिल 2019 ची असल्याचे सांगण्यात येत आहे. कर्नाटकातील (Karnataka) कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी बनवण्यासाठी राजीव कुमार, एस. श्रीशांत आणि व्यंकटेश किणी यांनी 25 एप्रिल 2019 रोजी एका तरुणाकडून 18.70 लाख रुपये घेतले होते.

सरिश गोपालन असे त्या तरुणाचे नाव असून तो चुंडा येथील रहिवासी आहे. याप्रकरणी त्याने या तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे.

दरम्यान, ही रक्कम स्पोर्ट्स अकादमीच्या बांधकामात गुंतवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोही त्याचा पाटर्नर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. या तक्रारीनंतर श्रीशांतसह तिन्ही लोकांविरुद्ध कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातर्गंत तिघांवरही फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातील श्रीशांत हा तिसरा आरोपी (Accused) आहे. यावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे बाकी आहे. हे संपूर्ण प्रकरण केरळच्या उत्तरीय जिल्ह्यातील आहे.

दुसरीकडे, 2013 च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीशांतचा सहभाग होता. त्यानंतर 2023 मध्ये त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली. त्यानंतर तो हरभजन सिंगसोबतच्या वादातही अडकला होता. याशिवाय, त्याच्या कारकिर्दीत आक्रमक स्वभावामुळे, वादांशी त्याचे नाते नेहमीच घट्ट राहिले. त्यानंतर तो टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसमध्येही दिसला आणि तिथेही तो अनेक वादात दिसला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

22 महिन्यांच्या मंत्रिपदानंतर बुधवारी संध्याकाळी सिक्वेरा; गुरुवारी सकाळी सभापती तवडकर देणार राजीनामा तर, कामतांना CM सावंतांकडून मिळाली हिंट

Rekha Gupta Attack: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांच्या 35 वर्षीय व्यक्तीने मारली कानाखाली? हल्लेखोराचा चेहरा समोर, आतिषीनी केला निषेध

Bicholim: चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील 'या' मार्गावर वाहनांना बंदी; जाणून घ्या पर्यायी व्यवस्था

Porvorim Roads: 'त्या' रस्त्याची चांगली 'पर्वरी'श झाली नाही; निवासी आणि प्रवासी संतप्त

Horoscope: प्रमोशन मिळणार, व्यापार वाढणार; कसा असणार 21 ऑगस्टचा दिवस; वाचा..

SCROLL FOR NEXT