Ravindra Jadeja - R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

SA vs IND: बॉक्सिंग डे कसोटीत जडेजाला का वगळलं? कर्णधार रोहितने सांगितलं खरं कारण

Ravindra Jadeja: द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जडेजाच्या जागेवर आर अश्विनला दिली संधी देण्यामागील कारण कर्णधार रोहित शर्माने सांगितले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma Revealed why Ravindra Jadeja is not in India's Playing XI for 1st Test match against South Africa:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला मंगळवारी (२६ डिसेंबर) सुरुवात झाली आहे. सेंच्युरियनला होत असलेला हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यातून भारताकडून प्रसिध कृष्णा याचे कसोटी पदार्पण झाले आहे. याबरोबरच आर अश्विनलाही या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. दरम्यान, या सामन्यात रविंद्र जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न देण्याबद्दल भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीवेळी खुलासा केला आहे.

खरंतर दक्षिण आफ्रिकेतील वेगवान गोलंदाजांना पोषक असलेले वातावरण पाहाता भारतीय संघ व्यवस्थापन चार वेगवान गोलंदाजांबरोबर एक फिरकी गोलंदाज खेळवेल अशी चर्चा होता, तसेच फिरकी गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजाला पहिली पसंती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

मात्र, नाणेफेकीवेळी रोहितने सांगितले की जडेजाला सकाळी पाठीमध्ये वेदना आहेत. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले असून आर अश्विनला संधी देण्यात आली आहे. रोहितने सांगितले की अश्विन हा संघाकडे असलेला एक दर्जेदार फिरकी गोलंदाज आहे.

दरम्यान, भारताने पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये अश्विनव्यतिरिक्त शार्दुल ठाकूर, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे.

तसेच भारतीय संघात सलामीसाठी यशस्वी जयस्वाल या युवा खेळाडूलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे, तर या सामन्यात केएल राहुल यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन -

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT