X/BCCI
क्रीडा

Rohit Sharma Century: धरमशालेत हिटमॅनचं विक्रमी शतक; कोच द्रविडची बरोबरी, तर युनिवर्स बॉसलाही टाकलं मागे

Rohit Sharma Century Record: धरमशाला येथे इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma record-break Century during India vs England 5th Test in Dharmsala

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना गुरुवारपासून (7 मार्च) सुरू झाला आहे. धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी करत काही मोठ्या विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहितने भारताच्या पहिल्या डावात 154 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले. पण शतकानंतर तो दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला बाद झाला. त्याला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने त्रिफळाचीत केले. रोहितने 162 चेंडूत 13 चौकार आणि 3 षटकारांसह 103 धावा केल्या.

रोहितने केली गावसकरांची बरोबरी

रोहितचे हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 12 वे शतक आहे. तसेच सलामीवीर म्हणून त्याचे इंग्लंड विरुद्धचे चौथे कसोटी शतक आहे.

त्यामुळे त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटीत सलामीला खेळताना सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर असेलल्या सुनील गावसकर यांची बरोबरी केली आहे. गावसकर यांनीही इंग्लंडविरुद्ध सलामीला खेळताना 4 शतके केली आहेत.

इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक शतके करणारे भारतीय सलामीवीर

  • 4 शतके - सुनील गावसकर

  • 4 शतके - रोहित शर्मा

  • 3 शतके - विजय मर्चंट

  • 3 शतके- मुरली विजय

  • 3 शतके - केएल राहुल

द्रविडची केली बरोबरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहित शर्माचे हे 48 वे शतक आहे. त्यामुळे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहितने तिसऱ्या क्रमांकावरील राहुल द्रविडची बरोबरी केली आहे.

द्रविडनेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतके केली आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर 100 शतकांसह सचिन तेंडुलकर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर 80 शतकांसह विराट कोहली आहे.

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय क्रिकेटपटू

  • 100 शतके - सचिन तेंडुलकर

  • 80 शतके - विराट कोहली

  • 48 शतके - राहुल द्रविड

  • 48 शतके - रोहित शर्मा

  • 38 शतके - विरेंद्र सेहवाग

  • 38 शतके - सौरव गांगुली

'युनिवर्स बॉस' गेलला टाकले मागे

रोहितने धरमशाला कसोटीत पहिल्या डावात केलेले शतक हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलामीवीर म्हणून 43 वे शतक आहे.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत रोहितने ख्रिस गेलच्या 42 शतकांच्या विक्रमाला मागे टाकत तिसरा क्रमांक मिळवला आहे. या यादीत 49 शतकांसह डेव्हिड वॉर्नर अव्वल क्रमांकावर आहे. तसेच 45 शतकांसह सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे सलामीवीर

  • 49 शतके - डेव्हिड वॉर्नर

  • 45 शतके - सचिन तेंडुलकर

  • 43 शतके - रोहित शर्मा

  • 42 शतके - ख्रिस गेल

  • 41 शतके - सनथ जयसुर्या

  • 40 शतके - मॅथ्यू हेडन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT