Rohit Sharma X/BCCI
क्रीडा

Rohit Sharma: '...त्यामुळे कर्णधार म्हणून कुठे कमी पडतो, ते कळालं', धरमशाला कसोटीपूर्वी रोहित झाला व्यक्त

India vs England, Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने दिलेल्या लढतीबद्दल रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma React on India vs England Series and Captaincy ahead of 5th test

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ७ मार्चपासून धरमशाला येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता.

यावेळी त्याने इंग्लंडविरुद्ध मालिकेत आघाडी घेतल्याचा आनंद आहेच, पण संघाने दिलेल्या लढ्याबद्दल कौतुक असल्याचे त्याने म्हटले. या मालिकेतून खूप काही शिकता आल्याचेही रोहितने म्हटले.

भारतीय संघाने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत चार सामन्यांनंतर 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने पराभव स्विकारला होता. परंतु, नंतर पुनरागमन करत सलग तीन सामने जिंकत मालिकेही खिशात घातली. आता या मालिकेतील अखेरचा सामना बाकी आहे.

या मालिकेबद्दल रोहित म्हणाला, 'इंग्लंड संघाचा सतत सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा दृष्टिकोन आणि भारतीय संघातील नवीन खेळाडूंमुळे या मालिकेतून कर्णधार म्हणून मला नवा अनुभव मिळाला.'

'नव्या खेळाडूंनी दडपण अंगावर घेत केलेल्या कामगिरीचे कौतुक वाटते आहे. कर्णधार म्हणून त्यांना थोडी दिशा देणे आणि वातावरण चांगले ठेवणे इतकेच काम केले आहे. या मालिकेने मला कर्णधार म्हणून मी कुठे कमी पडलो, हे देखील शिकवले.'

दरम्यान, धरमशाला हे हिमाचलच्या कुशीतील शहर असल्याने तिथे थंड वातावरण असते. तसेच गेल्या काही दिवसात येथे पावसाच्या सरीही बरसल्या आहेत. अशा वातावरणात खेळण्याबद्दल रोहित म्हणाला, 'धरमशालाचे वातावरण वेगळे आहे, मला तसे अजिबात वाटत नाही. कारण आम्ही थंड हवेत खेळलो आहोत आणि इथली खेळपट्टी भारतीय वाटते.'

'वातावरण ढगाळ झाले की थोडे गार हवेचे आव्हान असेल इतकेच. भारतीय संघ इथे आनंद घेत आहे. थोडे दडपण आले तर इथल्या मैदानावरून दिसणाऱ्या कमालीच्या सुंदर नजार्‍याकडे बघितले की दडपण नाहीसे होणार आहे इतकं सगळं सुंदर आहे.'

दरम्यान, हा कसोटी सामना भारताचा फिरकीपटू आर अश्विनच्या कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना असणार आहे. त्याबद्दलही रोहितने त्याचे कौतुक केले आहे.

रोहित म्हणाला, 'अश्विनचे मनापासून अभिनंदन. 100 कसोटी हा खूप मोठा पल्ला आहे. आम्ही 17 वर्षांखालील वयोगटापासून एकत्र क्रिकेट खेळलो आहे. मी पण सुरुवातीला ऑफिस्पिन गोलंदाजी करायचो, तर अश्विन फलंदाजी करायचा, पण नंतर आमच्या भूमिका बदलल्या आणि मला वाटतं आम्ही बर्‍यापैकी चांगली कामगिरी भारतीय संघासाठी केली आहे.'

'मला वाटते की अश्विन असा गोलंदाज आहे जो मेहनतीने त्याच्या गोलंदाजीत नाविण्यता आणत राहतो. गोलंदाजी करताना त्याला कोणला काय गोलंदाजी करतोय, हे माहित असते. तो विशेषत: भारतात मॅच विनर ठरला आहे.'

भारत आणि इंग्लंड संघात होणारा पाचवा कसोटी सामना 7 मार्चपासून सकाळी 9.30 वाजता चालू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "तुम्ही भाजपची B-Team, आम्हीच तुम्हाला नाकारतो", काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत; गोवा निवडणुकीत काँग्रेस 'एकला चलो रे'

Diwali 2025: पणत्या बनवण्याचा वारसा मावळतोय! डिचोलीतील व्यवसाय अंधाराखाली; राज्याबाहेरील पणत्यांची चलती

Goa Police App: गोवा पोलिस आता ‘स्‍मार्ट’ मोबाईलवर! सूचना, सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती मिळणार तात्काळ

Panaji: कारमध्ये कोंडले, लाथाबुक्यांनी केली मारहाण; तक्रारदाराची साक्ष देण्यास नकार; खंडणी प्रकरणातील 6 आरोपी निर्दोष

Goa Live News: कोलवाळ हायवेवरील एचपी पेट्रोल पंपाजवळ एका बलेनो कारची दुचाकीला धडक

SCROLL FOR NEXT