IND vs ENG: बेअरस्टोचे 'शतक' नक्की, तर 'या' गोलंदाजाचे पुनरागमन; धरमशाला कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग-11 जाहीर

England Playing XI: भारताविरुद्ध 7 मार्चपासून धरमशाला येथे सुरु होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर करण्यात आली आहे.
Jonny Bairstow | India vs England 5th Test Dharamsala
Jonny Bairstow | India vs England 5th Test DharamsalaX/englandcricket

England announced Playing XI for 5th Test against India

इंग्लंड विरुद्ध भारत संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशाला येथे 7 मार्चपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी एक दिवस आधीच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल केला आहे. इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक मोठा बदल केला आहे. इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये मार्क वूडला संधी दिली आहे. त्यामुळे त्याचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. त्याला ऑली रॉबिन्सनच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.

Jonny Bairstow | India vs England 5th Test Dharamsala
IND vs ENG: पाचव्या कसोटीत पाऊस बनणार व्हिलन? काय आहेत वातावरणाचे अंदाज, घ्या जाणून

दरम्यान, या सामन्यासाठी इंग्लंडने जॉनी बेअरस्टोला प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम ठेवले आहे. त्यामुळे आता बेअरस्टो धरमशालामध्येच त्याचा 100 वा कसोटी सामना खेळणार असल्याचे निश्चित झाले आहे.

याशिवाय या कसोटीसाठी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिलेली आहे. त्यामुळे त्याला कसोटीत 700 विकेट्स घेण्याची संधी असणार आहे. त्याने आत्तापर्यंत 186 कसोटीत 698 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे जर त्याने धरमशाला येते दोन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या, तर तो ७०० कसोटी विकेट्स घेणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरेल.

Jonny Bairstow | India vs England 5th Test Dharamsala
IND vs ENG, 5th Test: धरमशालेच राहणार फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व? कसे आहेत खेळपट्टीचे अंदाज

दरम्यान, पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडने झॅक क्रावली आणि बेन डकेट या सलामी जोडीवरच विश्वास कायम ठेवताना मधल्या फळीतही बदल केलेला नाही. त्यामुळे ऑली पोप, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स हे संघात कायम आहेत. त्यांना साथ देण्यासाठी स्टोक्सही असेल.

गोलंदाजी फळीत मार्क वूड आणि अँडरसन या वेगवान गोलंदाजांच्या जोडीसह शोएब बशीर आणि टॉम हार्टली या फिरकी गोलंदाजांची जोडी आहे. जो रुटही फिरकी गोलंदाजीत योगदान देऊ शकतो.

पाचव्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन

झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टली, मार्क वूड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com