Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: T20 विश्वचषकातील पराभवानंतर हिट मॅनने उचलले हे पाऊल, दिसणार हटके अंदाजात !

Rohit Sharma Viral Photos: टीम इंडियाला 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलपर्यंतच प्रवास करता आला.

दैनिक गोमन्तक

Rohit Sharma Viral Photos: टीम इंडियाला 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलपर्यंतच प्रवास करता आला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकानंतर टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेतही पराभवाचा सामना करावा लागला. सध्या रोहित आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या सगळ्यामध्ये रोहितचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

दरम्यान, टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे, तर दुसरीकडे रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माही या संधीचा पुरेपूर फायदा घेत पुनरागमनासाठी मेहनत घेत आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) नुकतेच त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रोहित शर्मा त्याच्या फिटनेसवर काम करताना दिसत आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. रोहितचे हे फोटो पाहून चाहते म्हणाले की, कठोर प्रशिक्षणानंतर तो स्लिम दिसू लागला आहे.

तसेच, 2022 च्या टी-20 विश्वचषकात रोहित शर्मा 6 डावात 19.33 च्या सरासरीने केवळ 116 धावा करु शकला. त्याचवेळी टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. रोहितच्या या खेळानंतर त्याला कर्णधारपदावरुन हटवल्याची चर्चा आहे. रोहित शर्मा बांगलादेश (Bangladesh) दौऱ्यावर परतणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 2 टेस्ट मॅचची सीरीज खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT