Rohit Sharma: हिट मॅनचा खेळ खल्लास! कर्णधारपदावरुन हटवण्याचा BCCI डाव

Indian Cricket Team captain: रोहित शर्मालाही टी-20 फॉरमॅटच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
Rohit Sharma
Rohit SharmaDainik Gomantak
Published on
Updated on

Rohit Sharma T20 Captaincy: T20 विश्वचषक-2022 मधील खराब कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्याची तयारी सुरु आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समिती बरखास्त करुन नव्याने अर्ज मागवले आहेत. दरम्यान, रोहित शर्मालाही टी-20 फॉरमॅटच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

याशिवाय, कर्णधारपदाचे विभाजन करण्याचाही विचार केला जात आहे. आता बीसीसीआयच्या सूत्रांचा हवाला देत एका अहवालात रोहितच्या जागी टी-20 फॉरमॅटमध्ये हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधारपद देण्याची घोषणा लवकरच केली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: रोहित घेणार मोठा निर्णय, कर्णधारपदाबाबत करु शकतो घोषणा

हार्दिक पांड्याला मिळणार कर्णधारपद !

स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला टी-20 मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते. सध्या तो न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, जिथे टीम इंडियाला (Team India) मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात हार्दिक टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळत आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी वेलिंग्टन येथे होणार होता, पण पावसामुळे तो नाणेफेक न होता रद्द करण्यात आला. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. या मालिकेतून रोहित शर्माला (Rohit Sharma) विश्रांती देण्यात आली आहे.

हार्दिकची तयारी सुरु

दरम्यान, बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी सांगितले की, हार्दिक टी-20 संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी पूर्णपणे फिट आहे. 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी तो आतापासून तयार होईल. इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्हाला आतापासूनच T20 विश्वचषक-2024 साठी तयारी करावी लागेल. या भूमिकेसाठी हार्दिक फिट आहे. पुढील T20 मालिकेपूर्वी सिलेक्टर्स भेटतील आणि हार्दिकची भारताचा कर्णधार म्हणून अधिकृत घोषणा करतील.'

Rohit Sharma
T20 World Cup Rohit Sharma: सरावा दरम्यान रोहित शर्माच्या उजव्या हाताला दुखापत

श्रीलंका मालिकेपूर्वी घोषणा शक्य

पुढील वर्षी जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वी रोहितच्या जागी हार्दिकला कर्णधारपद देण्याची अधिकृत घोषणा केली जाईल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. असे झाल्यास जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत हार्दिकला टी-20 मध्ये कर्णधार बनवले जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्यात 3-3 वनडे आणि मालिका खेळवली जाणार आहे. रोहित वनडे आणि कसोटी फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सांभाळणार आहे.

Rohit Sharma
Rohit Sharma: 'छोड छाड के अपने...,' रोहितने घेतली लहान मुलांची भेट; Video Viral

रोहितला दिली माहिती?

स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या न्यूझीलंडमध्ये कर्णधारपदाच्या सर्वात मोठ्या परीक्षेसाठी सज्ज झाला आहे. निकालाची पर्वा न करता त्याला नवा कर्णधार म्हणून घोषित केले जाईल, परंतु बीसीसीआयच्या अधिकाऱ्याला विचारले असता रोहित शर्माला या निर्णयाची माहिती आहे का? त्यावर ते म्हणाले की, 'नाही अजून नाही. रोहितला अद्याप ही माहिती देण्यात आलेली नाही. तो नुकताच टी-20 वर्ल्ड कपमधून परतला आहे. आम्ही लवकरच प्रशिक्षक, कर्णधार यांना मीटिंगसाठी बोलवू आणि त्यानंतर त्याबाबत बोलू.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com