Rohit Sharma on Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma on Suryakumar Yadav: "कधीच हार मानली नाही, तो 'फायटर' आहे!" 'सूर्या'चं कर्णधारपद गेल्यानंतर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया

Rohit Sharma on Surya Removed as Captain: टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात अत्यंत धक्कादायक आणि मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

Sameer Amunekar

टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय क्रिकेट संघात अत्यंत धक्कादायक आणि मोठे बदल पाहायला मिळत आहेत. निवडकर्त्यांनी सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवले असून, त्याच्या जागी श्रेयस अय्यरची भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. विश्वचषक जिंकून दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच सूर्याला संघातून बाहेर करण्याचा हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत चक्रावून टाकणारा ठरला आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने आपले मत मांडले असून, त्याने सूर्यकुमार यादवचे जोरदार समर्थन केले आहे.

सूर्यासाठी हा काळ कठीण, रोहितकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबई येथे आयोजित 'टी-२० मुंबई लीग' दरम्यान माध्यमांशी बोलताना रोहित शर्माने सूर्याला संघातून वगळण्यावर आपली प्रतिक्रिया दिली. रोहितच्या मते, हा काळ सूर्यासाठी अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक असेल.

रोहित म्हणाला, "मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय कोणासाठीही सोपा नव्हता, विशेषतः सूर्यासाठी हा खूप मोठा धक्का असेल." सूर्याच्या संघर्षाची आठवण करून देताना रोहित पुढे म्हणाला की, सूर्यकुमारने वयाच्या ३० किंवा ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. याचा अर्थ असा की त्याने कधीही हार मानली नाही. तो नेहमीच स्पर्धेत टिकून राहिला आणि जेव्हा त्याला संधी मिळाली, तेव्हा त्याने दोन्ही हातांनी त्याचे सोने केले. रोहितने सूर्याला एक खरा 'फायटर' म्हणून संबोधले.

नवा कर्णधार श्रेयस अय्यरबद्दल रोहितचे मोठे विधान

श्रेयस अय्यरकडे भारतीय टी-२० संघाची धुरा सोपवण्याच्या निर्णयाचेही रोहित शर्माने स्वागत केले आहे. श्रेयसच्या आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधील कप्तानीचा दाखला देत रोहितने सांगितले की, गेल्या काही वर्षांत श्रेयसने आपल्या फ्रेंचायझीचे ज्या प्रकारे नेतृत्व केले आहे, ते पाहता त्याचा भारतीय संघासोबतचा आगामी काळ नक्कीच चांगला असेल. रोहितने स्पष्ट शब्दांत सांगितले की, "भारतीय क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हिंमतीवर कमवावी लागते. श्रेयसने कर्णधारपद आणि लोकांचा आदर आपल्या कामगिरीच्या जोरावर कमावला आहे आणि तो या पदासाठी पूर्णपणे पात्र आहे."

आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

कर्णधारपदाच्या या मोठ्या बदलानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी १६ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघात अनेक युवा आणि गुणवान खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

भारतीय टी-२० संघ खालीलप्रमाणे आहे: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT