Goa Monsoon Update: राज्यात मान्सून सक्रिय, हवामान विभागाकडून 10 जूनपर्यंत 'यलो अलर्ट'

Goa Monsoon Update: भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) जारी केलेल्या निवेदनानुसार, नैऋत्य मान्सूनने संपूर्ण गोवा राज्य व्यापले आहे.
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) जारी केलेल्या निवेदनानुसार, नैऋत्य मान्सूनने संपूर्ण गोवा राज्य व्यापले आहे. यासोबतच मान्सूनने कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या आणखी काही भागांतही प्रगती केली असून, तामिळनाडूचा बहुतांश भाग तसेच बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील अनेक प्रदेशही व्यापले आहेत.

राज्यात हवामान खात्याने १० जूनपर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. पणजीसह राज्यभरात काल पहाटेपासून पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याचा वारा किंवा गडगडाट न करता मान्सून सक्रिय होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Goa Monsoon Update
Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

१ ते ६ जूनपर्यंत राज्यात सुमारे दोन इंच पावसाची नोंद झाली. शिवाय पुढील ३ तासांत उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील तालुक्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Weather October Heat
Super El Nino Weather Pattern Pacific Ocean
Goa Climate Technology Projects
Goa weather update
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com