World Longest Hair Record: लांब केसांची भन्नाट क्रेझ! उत्तराखंडच्या महिलेनं रचला अनोखा रेकॉर्ड; केसांची लांबी पाहून तुम्हीही व्हाल थक्क Watch Video

Renu Dhariyal Longest Hair Guinness World Record: उत्तराखंडमधील रेणू धारियाल या महिलेने आपल्या अद्भूत आणि तब्बल 9 फूट लांब केसांच्या जोरावर 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले.
Renu Dhariyal Longest Hair Guinness World Record
World Longest Hair RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Renu Dhariyal Longest Hair Guinness World Record: भारतीय संस्कृतीत लांबसडक आणि घनदाट केस हे सौंदर्याचे लक्षण मानले जाते. याच सौंदर्याच्या जोरावर उत्तराखंडमधील एका महिलेने असा काही पराक्रम केला, ज्याची दखल थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. उत्तराखंडमधील रेणू धारियाल या महिलेने आपल्या अद्भूत आणि तब्बल 9 फूट लांब केसांच्या जोरावर 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले. तिचे हे केस पाहून पहिल्या नजरेत कोणाचाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या केसांची विशेष काळजी घेत एकही केस न कापल्यामुळे आज हा ऐतिहासिक टप्पा गाठला.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत माहितीनुसार, रेणू धारियाल यांच्या केसांची एकूण लांबी 271.50 सेंटीमीटर म्हणजेच अंदाजे 8 फूट 10 इंच एवढी मोजली गेली. 15 एप्रिल 2026 रोजी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे त्यांच्या केसांची अधिकृत मोजणी करण्यात आली होती. त्यांच्या केसांची लांबी किती अवाढव्य आहे, याचा अंदाज यावरुन लावला जाऊ शकतो की, जगातील सर्वात उंच व्यक्ती म्हणून नोंद असलेल्या रॉबर्ट वाडलो यांच्या उंचीच्या (272 सेमी) बरोबरीचे रेणू यांचे केस आहेत. जेव्हा रेणू आपले केस मोकळे सोडतात, तेव्हा ते जमिनीवर लोळतात.

Renu Dhariyal Longest Hair Guinness World Record
Uttarakhand Gold Cup: जम्मू-काश्मीरविरुद्ध गोवा ढेपाळला, उत्तराखंड क्रिकेट स्पर्धेत 73 धावांनी पराभूत; फलंदाजांची हाराकिरी

या अद्भूत आणि लांबसडक केसांचे रहस्य सांगताना रेणू यांनी स्पष्ट केले की, 2015 पासून त्यांनी एकदाही आपले केस कापलेले नाहीत. एवढ्या लांब केसांची निगा राखणे ही अत्यंत कठीण आणि संयमाची गोष्ट आहे. हे केस धुण्यासाठी आणि ते सुकवून गुंता काढण्यासाठी त्यांना दररोज तासन्तास मेहनत घ्यावी लागते. केसांच्या आरोग्यासाठी (Health) त्या बाजारातील केमिकल उत्पादनांऐवजी पूर्णपणे नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करतात. त्या घरगुती पद्धतीने तयार केलेले आयुर्वेदिक हेअर ऑइल आणि नैसर्गिक शॅम्पूचा वापर करतात. दैनंदिन कामे करताना अडचण येऊ नये म्हणून त्या आपल्या केसांची एक लांब वेणी बांधून ठेवतात.

Renu Dhariyal Longest Hair Guinness World Record
Uttarakhand Wedding Destination: शिव-पार्वतीच्या साक्षीने बांधा लगीन गाठ, उत्तराखंडची ही ठिकाणं ठरत आहेत बेस्ट वेडिंग डेस्टिनेशन्स

यापूर्वी हा जागतिक विक्रम युक्रेनच्या आलिया नासीरोवा हिच्या नावावर होता. तिच्या केसांची लांबी 257.33 सेंटीमीटर म्हणजेच साधारण 8 फूट 5.3 इंच इतकी होती. रेणू धारियाल यांनी 271.50 सेंटीमीटर लांबी गाठत हा जुना विक्रम 14 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतराने मोडीत काढला. आपल्या या अनोख्या वैशिष्ट्यामुळे रेणू सोशल मीडियावरही प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. त्या एक उत्तम कंटेंट क्रिएटर असून यूट्यूबवर केसांची काळजी घेण्याबाबत आणि सौंदर्याविषयी टिप्स शेअर करत असतात. जेव्हा त्या घरातून बाहेर पडतात, तेव्हा त्यांचे हे नऊ फुटी केस पाहून लोक थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com