Rohit Sharma at toss | Memes Viral Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand: अन् टॉसवेळी रोहितचा झाला 'गजनी', सोशल मीडियावर मजेदार मीम्स Viral

रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वनडेत नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा हेच विसरला होता.

Pranali Kodre

India vs New Zealand, 2nd ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रायपूरला वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. या सामन्याच्या नाणेफेकीवेळी एक गमतीशीर घटना घडली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकीनंतर काय निर्णय घ्यायचाय याबाबतच गोंधळलेला दिसला. यानंतर अनेक मीम्स व्हायरल झाले.

झाले असे की या सामन्याच्या नाणेफेकीसाठी रोहित आणि न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम मैदानावर आले. त्यावेळी त्याच्याबरोबर समालोचक रवी शास्त्री आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ मैदानावर होते.

यावेळी रोहितने नाणे वर उडवले आणि लॅथमने हेड्सचा कॉल दिला. कॉल त्याच्या विरोधात लागला आणि रोहितने नाणेफेक जिंकली. पण नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय घ्यायचा, हे रोहितला लक्षात येईना. अखेर काही सेकंदांनंतर रोहितला संघाने काय निर्णय घ्यायचा, हे लक्षात आले आणि त्याने भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करणार असल्याचे सांगितले.

या घटनेबद्दल रोहितने सांगितले की 'मी विसरलो होतो की आम्हाला काय करायचे आहे. संघाबरोबर नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल खूप चर्चा झाली होती. आम्हाला कठीण परिस्थितीत स्वत:ला आव्हान द्यायचे होते. पण आम्ही प्रथम गोलंदाजी करू.'

या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी मीम्सही शेअर केले आहेत.

भारताने जिंकला सामना

या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 34.3 षटकात सर्वबाद 108 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावा केल्या. तसेच मायकल ब्रेसबेलने 22 आणि मिशेल सँटेनरने 27 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

तसेच त्यानंतर न्यूझीलंडने दिलेल्या 109 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहितने अर्धशतकी खेळी केली. त्याने 50 चेंडूत 51 धावा केल्या. तसेच त्याने शुभमन गिलबरोबर सलामीला 72 धावांची भागीदारी रचली. गिलने नाबाद ४० धावांची खेळी केली.

तसेच विराट कोहली 11 धावांवर बाद झाला, तर ईशान किशनने नाबाद 8 धावा केल्या. त्यामुळे भारताने 20.1 षटकात 2 बाद 111 धावा करत सामना जिंकला. न्यूझीलंडकडून मिशेल सँटेनरने विराटला आणि रोहितला हेन्री शिपलीने बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू अखेर पोलिसांच्या ताब्यात! मोपा विमानतळावरून थेट वैद्यकीय तपासणीसाठी

SCROLL FOR NEXT