'इराणचे नवे सर्वोच्च नेते जिवंत आहेत, पण...', डोनाल्ड ट्रम्पचा मोठा धमाका; मोजतबा खामेनेईंच्या प्रकृतीबाबत केला धक्कादायक दावा

Mojtaba Khamenei Injured: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल एक धक्कादायक आणि खळबळजनक दावा केला.
Mojtaba Khamenei Injured
Donald Trump vs Mojtaba KhameneiDainik Gomantak
Published on
Updated on

Donald Trump vs Mojtaba Khamenei: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता केवळ क्षेपणास्त्रांपुरता मर्यादित न राहता एका मोठ्या 'माहिती युद्धा'त (Information War) रुपांतरित झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबद्दल एक धक्कादायक आणि खळबळजनक दावा केला.

ट्रम्प यांच्या मते, मोजतबा खामेनेई जिवंत तर आहेत, परंतु ते अत्यंत गंभीर अवस्थेत जखमी झाले आहेत. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका (America) आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात मोजतबा यांना लक्ष्य करण्यात आले, असा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या या दाव्याला ब्रिटिश वृत्तपत्र 'द सन'च्या रिपोर्टमुळे अधिक बळकटी मिळाली असून त्यामध्ये मोजतबा यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत संवेदनशील माहिती देण्यात आली.

Mojtaba Khamenei Injured
Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

'द सन'च्या रिपोर्टनुसार, मोजतबा खामेनेई सध्या इराणची (Iran) राजधानी तेहरानमधील 'सिना युनिव्हर्सिटी अँड हॉस्पिटल'मध्ये कडक सुरक्षा व्यवस्थेत उपचार घेत आहेत. या हल्ल्यात त्यांना इतक्या गंभीर जखमा झाल्या आहेत की, डॉक्टरांना त्यांचा एक पाय कापून टाकावा लागला. एवढेच नव्हे, तर त्यांच्या पोटाला आणि यकृतालाही मोठी इजा पोहोचली असून ते सध्या 'कोमा'मध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जरी इराणच्या अधिकृत यंत्रणांनी मोजतबा जखमी झाल्याची कबुली दिली असली, तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त ते सातत्याने फेटाळत आहेत. इराणच्या दाव्यानुसार, मोजतबा सुरक्षित असून ते वेगाने बरे होत आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने संशयाचे वातावरण गडद होत चालले आहे.

Mojtaba Khamenei Injured
Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

सायप्रसमधील इराणचे राजदूत अलीरेजा सलारियन यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती देताना सांगितले की, मोजतबा यांच्या हाता-पायांना दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती सध्या इतकी चांगली नाही की ते लोकांसमोर येऊन जाहीर भाषण देऊ शकतील. विशेष म्हणजे, कालच इराणच्या सरकारी माध्यमांनी मोजतबा यांचा एक लेखी संदेश प्रसिद्ध केला. या संदेशात त्यांनी इराणची सूत्रे आपल्या हाती असल्याचे सांगत अमेरिकेला कडक इशारा दिला. जोपर्यंत अमेरिका अरब देशांमधील आपले लष्करी तळ बंद करत नाही, तोपर्यंत इराणचे हल्ले सुरुच राहतील, अशी धमकी या संदेशात देण्यात आली. मात्र, मोजतबा स्वतः कॅमेऱ्यासमोर न आल्याने या विधानावरही शंका उपस्थित केली जात आहे.

Mojtaba Khamenei Injured
Iran-USA War: "युद्ध कधी संपवायचं हे अमेरिका नाही, आम्ही ठरवू'' ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणचा संतप्त इशारा; तेलपुरवठा रोखण्याचीही दिली धमकी

दुसरीकडे, इस्रायली संरक्षण दलाने (IDF) थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणला कोंडीत पकडले आहे. आयडीएफने 'X' वर पोस्ट करत थेट प्रश्न विचारला की, "मोजतबा खामेनेई नक्की कुठे आहेत?" इराणच्या नवीन नेत्याकडून धमक्या येत आहेत, त्यांचे संदेश प्रसारित होत आहेत, परंतु त्यांचे थेट दर्शन का घडवले जात नाही? असा सवाल इस्रायलने विचारला. इराण नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे?

Mojtaba Khamenei Injured
Iran-Israel war impact on India: इराण-इस्रायल तणावामुळे भारतात महागाईचा 'बॉम्ब' फुटणार? पेट्रोल-डीजलसह 'या' वस्तूंच्या किमती भडकणार

अली खामेनेई यांच्याप्रमाणेच मोजतबा यांचाही मृत्यू तर झाला नाही ना? अशा प्रश्नांच्या सरबत्तीमुळे इराणच्या सत्तेच्या वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोजतबा खामेनेईंचे सार्वजनिकरित्या समोर न येणे हे केवळ सुरक्षिततेचे कारण आहे की त्यांच्या मृत्यूची बातमी दडवण्यासाठी केलेली ही रणनीती आहे, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com