IND vs NZ: भारत-न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडेचे ठिकाण बदलले? उच्च न्यायालयाने...!

IND vs NZ 3rd ODI Match: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 21 जानेवारीला होणार आहे.
IND vs NZ
IND vs NZDainik Gomantak
Published on
Updated on

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना 21 जानेवारीला होणार आहे, तर तिसरा सामना 24 जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे. (Change Of Venue For IND vs NZ 3rd ODI Match)

याआधी सामन्याच्या तिकिटांच्या विक्रीत काळाबाजार केल्याप्रकरणी वाद निर्माण झाला होता.

अशा स्थितीत, या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन त्यावर सुनावणीही झाली. या संपूर्ण प्रकरणाकडे पाहता या सामन्याच्या ठिकाणामध्ये बदल होऊ शकतो, असे मानले जात होते. या संपूर्ण वादावर आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 24 जानेवारी रोजी इंदूर येथे होणार्‍या एकदिवसीय सामन्याच्या तिकिटांच्या ऑनलाइन विक्रीतील अनियमिततेबाबत दाखल करण्यात आलेली जनहित याचिका मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने याचिकाकर्त्याला न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या व्यक्तीने आरोपांची सत्यता पडताळून न पाहता केवळ लोकप्रियता मिळविण्यासाठी ही याचिका दाखल केल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

IND vs NZ
IND vs NZ: भारत-न्यूझीलंड मालिकेतील दुसऱ्या वनडेपूर्वीच आली मोठी बातमी, रोहितचं जाणार कर्णधारपद!

असा आरोप काँग्रेस नेत्याने केला आहे

काँग्रेस नेते राकेश सिंह यादव यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन (एमपीसीए) आणि राज्य सरकार विरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकामध्ये आगामी इंडिया-न्यूझीलंड सामन्याच्या तिकिटांचा गैरव्यवहार आणि काळाबाजार केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीलाही कर महसुलाचे नुकसान झाले.

दुसरीकडे, एमपीसीएच्या वतीने हे आरोप फेटाळून लावत, एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे ही याचिका दाखल करण्यात आली आहे, असा युक्तिवाद उच्च न्यायालयात (High Court) करण्यात आला.

IND vs NZ
IND vs NZ: ...म्हणून शुभमन गिल ईशान किशनला घालतो शिव्या, स्वत:च केलाय खुलासा; Video Viral

कोर्टाने आपल्या निर्णयात असे म्हटले आहे

उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एसए धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती प्रकाशचंद्र गुप्ता यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन 18 जानेवारी रोजी याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, 'याचिकाकर्त्याने प्रतिवादींवर लावण्यात आलेल्या आरोपांची सत्यता पडताळून न पाहता जनहित याचिका दाखल केली आहे.'

तसेच, त्यांनी आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. केवळ लोकप्रियता मिळवण्याच्या उद्देशाने ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com