Goa Milk Producers: दूध उत्पादकांना दिलासा! मुख्यमंत्र्यांकडून मागण्या मान्य, आधारभूत किंमत दर महिन्याला मिळणार

CM Pramod Sawant: गेले दोन दिवस कुर्टी - फोंडा येथील गोवा डेअरीसमोर दूध उत्पादक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत.
Goa Milk Producers
Goa Milk ProducersDainik Gomantak
Published on
Updated on

Pramod Sawant milk producers support : दूध खरेदी दरात वाढ करण्याबरोबरच इतर काही मागण्यांसाठी दूध उत्पादकांनी छेडलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे. दूध उत्पादकांना दर फरकाची रक्कम प्रत्येक महिन्याला देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले असून दूध खरेदी दराबाबत गोवा डेअरी तसेच इतर सर्व संबंधितांच्या बैठकीत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गुरुवारी दूध उत्पादकांची ही बैठक मुख्यमंत्र्यांसमवेत झाली.

गेले दोन दिवस कुर्टी - फोंडा येथील गोवा डेअरीसमोर दूध उत्पादक आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. गेला बराच काळ दूध उत्पादकांना आधारभूत किंमत अदा केलेली नाही, त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. दूध उत्पादकांना वेळेवर जर आधारभूत किंमत मिळाली, तर ते सोयिस्कर ठरेल, असे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे.

Goa Milk Producers
Goa Dairy Milk Price: 'दूध खरेदी दरात वाढ करा, अन्यथा आंदोलन'! उत्पादकांचा इशारा; गोवा डेअरीला दिले निवेदन

गुरुवारी झालेल्या बैठकीत दूध उत्पादकांसमवेत गोवा डेअरी, सुमूल डेअरी तसेच संबंधित सर्व सरकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

Goa Milk Producers
Milk Producers Meeting: "शेतकऱ्यांना सावरा, दुधाला आधारभूत किंमत द्या!" उत्तर गोवा दूध उत्पादक संघटनेची सरकारकडे आर्त हाक

या बैठकीत दूध उत्पादकांना आधारभूत किंमत दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दूध उत्पादकांनी गाईच्या दुधाला दहा रुपये तर म्हशीच्या दुधाला पंधरा रुपये दरवाढ मागितली होती, त्यावर गोवा डेअरीची आर्थिक स्थिती पाहून तसेच सर्व संबंधितांशी बोलणी करून निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com