Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma: रोहित शर्माला का म्हणतात 'हिटमॅन', कुठून आले हे नाव? टोपणनावाविषयी वाचून तुम्हीही म्हणाल...

Rohit Sharma: फॅन्स आणि फॉलोअर्सपासून ते टीममेट्सपर्यंत त्याला याच नावाने संबोधले जाते.

Manish Jadhav

Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा क्रिकेट जगतात त्याच्या ओपनिंग आणि शानदार बॅटिंगसाठी जितका ओळखला जातो, तितकाच त्याच्या टोपणनासाठी देखील प्रसिद्ध आहे.

फॅन्स आणि फॉलोअर्सपासून ते टीममेट्सपर्यंत त्याला याच नावाने संबोधतात. हे नाव 'हिटमॅन' आहे, जे फक्त टोपणनाव नाही तर त्याच्या संपूर्ण ओळखीचे वर्णन करते.

दरम्यान, जरी, तो "शर्मा जी का लडका" म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच्या चाहत्यांना तो हिटमॅनच्या प्रतिमेत अधिक आवडतो. त्याला हे टोपणनाव कसे मिळाले, कोठून आले? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. चला तर मग त्याच्या वाढदिवसानिमित्त याविषयी सविस्तर जाणून घेऊया...

फलंदाजीची शैली ठरली नावामागील कारण?

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या खेळाशी परिचित असलेल्यांना हे माहीत आहे की, मैदानात परिस्थिती कशीही असली तरी त्याला षटकार मारण्यासाठी फारशी धडपड करावी लागत नाही.

विशेष म्हणजे, ज्या सहजतेने तो फटकेबाजी करतो, त्याने त्याला 'हिटमॅन' हे नाव मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

...म्हणून रवी शास्त्रीसोबतही टोपण नावाचे कनेक्शन आहे

त्याला हे नाव 2013 मध्ये मिळाले. त्यानंतर त्याने बंगळुरु येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले.

रोहितच्या टोपणासंबंधी खुलासा करताना, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्त्री यांनी त्याला ही नवीन ओळख (हिटमॅन) मिळवून देण्यात कशी मदत केली ते सांगितले होते.

जेव्हा षटकाराने द्विशतक पूर्ण झाले आणि मग...

तेव्हा रोहित 197 धावांवर खेळत होता. त्याने एका षटकारासह द्विशतक पूर्ण केले. दरम्यान, शास्त्री यांनी कॉमेंट्री करताना सांगितले की, "एकदिवसीय सामन्यात 200 धावा करण्याचा हा नवा अध्याय आहे! ते त्याला हिटमॅन म्हणाले आणि तो पार्टीत पोहोचला." येथूनच रोहितला 'हिटमॅन' हे नाव मिळाले. त्यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्याला हिटमॅन म्हणण्यास सुरुवात केली.

तेव्हा रोहितला माही भाईचा सल्ला...

2 नोव्हेंबर 2013 रोजी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) सामन्यात धोनीने त्याला अर्धशतकापर्यंत सावधपणे खेळण्याचा सल्ला दिला होता.

कारण रोहित कोणत्याही गोलंदाजाची धुलाई करु शकतो, यावर धोनीचा विश्वास होता. परंतु रोहितने त्याची सूचना मान्य केली नाही आणि त्यानंतर त्याने झेवियर डॉर्थीच्या एका षटकात चार षटकार ठोकले.

त्याने 158 चेंडूत 209 धावांची तूफानी खेळी खेळली. हे त्याचे वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक होते.

रोहितला हिटमॅन म्हणण्यामागे आणखी एक स्टोरी

तसेच, रोहितला हिटमॅन म्हणण्यामागे आणखी एक स्टोरी आहे. त्याच्या नावाच्या शेवटी हिट (HIT) येते. हिंदीत "हिट" चा अर्थ मारणे असा होतो, रोहित मैदानावर तूफानी फटकेबाजी करतो...

हिट (मारणे) आणि मॅन (व्यक्ती) यांना एकत्र करुन त्याला 'हिटमॅन' बनवले. तथापि, हिटमॅन हे प्रत्यक्षात एक व्हिडिओ गेम पात्र आहे, जो "एजंट 47" नावाचा क्लोन केलेला कॉन्ट्रॅक्ट किलर आहे, जो त्याला सापडलेल्या लक्ष्यांची हत्या करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT