Jio Cinema ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या चालू हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून साइन केले आहे.
जिओ सिनेमा लवकरच रोहित शर्मासोबत प्रोमो आणि ॲण्ड कॅम्पेन घेऊन येणार आहे. जिओ सिनेमा आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही रिलायन्स ग्रुपच्या मालकीचे आहेत.
जिओ सिनेमाकडे आयपीएलचे (IPL) डिजिटल राइट्स आहेत. जिओ सिनेमाने सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार यादव, एमएस धोनी आणि स्मृती मानधना यांसारख्या नामवंताना ॲम्बेसेडर म्हणून साइन केले आहे.
कंपनीने म्हटले आहे की, रोहित OTT प्लॅटफॉर्मच्या दृष्टीकोनातून स्पोर्ट्स व्यूइंगला डिजिटल पर्याय बनवण्याच्या दृष्टीकोनातून काम करेल. वॉल्ट डिस्ने कंपनी इंडियाच्या मालकीच्या स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने गेल्या महिन्यात बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगला (Ranveer Singh) ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून साइन केले होते.
रोहित ओटीटी प्लॅटफॉर्मवर टीमसोबत काम करेल. यावेळी रोहित म्हणाला की, "एका नव्या प्रवासाचा भाग बनून खूप आनंद होत आहे." वायकॉम18 स्पोर्ट्सचे सीईओ अनिल जयराज म्हणाले की, “रोहित हा खेळाडूवृत्ती आणि अतुलनीय नेतृत्वाचे प्रतीक आहे. या हंगामासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म इंडियन प्रीमियर लीग विनामूल्य प्रसारित करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.