Rohit Sharma 200 t20 matches as a captain: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत रविवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात सामना सुरू आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेला हा सामना रोहित शर्मासाठी खास ठरला आहे.
रोहितसाठी कर्णधार म्हणून हा टी२० क्रिकेटमधील २०० वा सामना ठरला आहे. त्यामुळे तो टी२० क्रिकेटमध्ये २०० टी२० सामने कर्णधार म्हणून खेळणारा जगातील तिसराच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम केवळ एमएस धोनी आणि डॅरेन सॅमी यांनी केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे धोनी एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याने ३०० हून अधिक टी२० सामन्यात नेतृत्व केले आहे. तसेच तो अद्यापही चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएलमध्ये नेतृत्व करत आहे. धोनीने ३०७ टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून १७९ सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. तसेच १२३ सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले, तर ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
त्याचबरोबर डॅरेन सॅमीने २०८ टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून १०४ सामन्यात विजय मिळवला आहे आणि ९७ सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले असून ५ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
रोहितने आत्तापर्यंत कर्णधार म्हणून पूर्ण झालेल्या १९९ टी२० सामन्यांपैकी १२२ सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच ७३ सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच ४ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. विशेष म्हणजे रोहितने आत्तापर्यंत केवळ भारत आणि मुंबई इंडियन्स या संघांचेच नेतृत्व केले आहे.
महत्त्वाचे म्हणजे आत्तापर्यंत २०० किंवा त्यापेक्षा अधिक टी२० सामन्यांमध्ये केवळ या तीनच खेळाडूंना नेतृत्व करता आले आहे. या तिघांच्या पाठोपाठ विराट कोहली असून त्याने १९० टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. तर गौतम गंभीरने १७० सामन्यांमध्ये टी२० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.