Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: 'हिटमॅन' ची सिंहगर्जना! एकाच सामन्यात बनवले 2 रेकॉर्ड, विराट-धोनीला टाकले मागे

IND vs SA 2nd T20 Match: T20 विश्वचषक 2022 पूर्वी, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) सलग दोन सामने जिंकून लय साधली आहे.

दैनिक गोमन्तक

Rohit Sharma New Record, IND Vs SA: T20 विश्वचषक 2022 पूर्वी, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) सलग दोन सामने जिंकून लय साधली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी हा सामना अविस्मरणीय ठरला. रोहितने या सामन्यात फलंदाजासोबतच कर्णधार म्हणूनही चमकदार कामगिरी केली. रोहितने या सामन्यात 2 मोठे विक्रमही केले, जे यापूर्वी कोणताही भारतीय खेळाडू करु शकला नाही.

दरम्यान, रोहितने मैदानात उतरताच या सामन्यात एक मोठा विक्रम केला. रोहित शर्माचा हा 400 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. रोहित शर्मा हा आकडा गाठणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला, तर जगातील नववा खेळाडू ठरला आहे. रोहित व्यतिरिक्त, दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि एमएस धोनी (MS Dhoni) हे भारतीय खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 350 हून अधिक सामने खेळले आहेत.

असा पराक्रम करणारा पहिला भारतीय कर्णधार

टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (South Africa) पराभूत करुन मालिका जिंकली. या मालिका विजयासह रोहित भारतातील T20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतात (India) एकही टी-20 मालिका गमावली नव्हती. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी 2015 मध्ये मालिका 2-0 ने जिंकली होती, त्यानंतर 2019 मध्ये 1-1 अशी बरोबरी साधली होती, तर या वर्षी जुलैमध्ये देखील दोन्ही संघांमधील मालिका 2-2 ने बरोबरीत संपली होती.

कर्णधार रोहितची शानदार खेळी

या सामन्यात रोहित शर्माने (Rohit Sharma) 37 चेंडूत 43 धावा केल्या. रोहित शर्माने संघाला शानदार सुरुवात करुन देण्याचे काम केले. या डावात त्याने 7 चौकार आणि 1 षटकारासह शानदार फटकेबाजी केली. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 237 धावा केल्या, याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 3 विकेट गमावून 221 धावाच करु शकला. टीम इंडियाच्या या विजयात सूर्यकुमार यादवचे योगदान विसरता येणार नाही. त्याने या डावात 22 चेंडूत 61 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

SCROLL FOR NEXT