IND vs SA 2nd T20I: चुरशीच्या सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर 16 धावांनी मात

मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी; डेव्हिड मिलरची नाबाद झंजावाती शतकी खेळी
India vs South Africa
India vs South AfricaDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs SA 2nd T20I: साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 16 धावांनी विजय मिळवला. भारताच्या 237 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाने चांगली झुंज दिली मात्र त्यांना 3 बाद 221 धावांपर्यंत मजल मारता आली. डेव्हिड मिलरने केलेली नाबाद वादळी शतकी खेळी (47 चेंडूत नाबाद 106) व्यर्थ ठरली. त्याला क्विंटन डीकॉक याने नाबाद 63 धावा करत उत्तम साथ दिली.

India vs South Africa
Table Tennis Championships मध्ये भारताने केला जर्मनीचा 3-1 ने पराभव

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तसेच या विजयामुळे भारताने सलग 11 वा मालिका विजय मिळवला आहे.

भारताने विजयासाठी ठेवलेल्या 238 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरूवात खराब झाली. अर्शदीप सिंगने दुसऱ्याच षटकात आफ्रिकेला दोन धक्के दिले. त्याने टेम्बा बाऊमाला आणि रिली रासोव्हला शुन्यावर बाद केले. त्यानंतर एडिन मार्क्रमने 19 चेंडूत आक्रमक 33 धावा केल्या. मात्र अक्षर पटेलने त्याची दांडी गूल केली.

पॉवर प्लेमध्येच तीन धक्के बसल्यानंतर डेव्हिड मिलर आणि क्विंटन डिकॉक या डावखुऱ्या जोडीने आफ्रिकेचा डाव सावरला. डेव्हिड मिलरने तुफान फटकेबाजी करत 12 व्या षटकात आफ्रिकेचे शतक धावफलकावर लावले. त्याला डिकॉकने बॉल टू रन खेळत चांगली साथ दिली. डेव्हिड मिलरने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मिलरनंतर डिकॉकनेही आपला गिअर बदलत 39 चेंडूत अर्धशतकी मजल मारली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत आफ्रिकेला 200 च्या पुढे नेले.

India vs South Africa
IND vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ODI मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर

तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी पॉवर प्लेची आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांना भारताला पहिल्या 3 षटकात 21 धावांपर्यंतच मजल मारून देता आली. पहिल्या तीन षटकात फारसे हात खोलण्याची संधी न मिळालेल्या रोहित-राहुल जोडीने पुढच्या तीन षटकात तुफान फटकेबाजी करत भारताला 6 षटकात बिनबाद 57 धावांपर्यंत पोहचवले.

केशव महाराजने भारताला पहिला धक्का देताना रोहितला 43 धावांवर बाद करत रोहित-राहुलची भागीदारी 96 धावांवर संपुष्टात आणली. त्यानंतर के. एल. राहुलने अर्धशतक पूर्ण केले. मात्र केशव महाराज याच्याच चेंडुवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात तो 57 धावांवर पायचित झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला सूर्यकुमार यादव पॅव्हेलियनमध्येच सेट होऊल आला होता. त्याने केवळ 18 चेंडूत दमदार अर्धशतक ठोकत भारताला 15 व्या षटकाच 155 धावांपर्यंत पोहचवले. दुसऱ्या बाजूने त्याला विराट कोहलीने देखील चांगली साथ दिली. या दोघांनी 42 चेंडूतच शतकी भागीदारी रचत भारताला 17 व्या षटकातच 200 चा टप्पा पार करून दिला. सूर्या 22 चेंडूत 61 धावा करून धावबाद झाला. शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने आपला जलवा दाखवत 7 चेंडूत 17 धावा करत भारताला 237 धावांपर्यंत पोहचवले. भारताची ही दक्षिण आफ्रिकेविरूद्धची टी 20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com