Virat Kohli and Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Team India: T20 संघात रोहित अन् विराटची निवड होणार नाही, रिपोर्टमधून आले समोर

Rohit Sharma And Virat Kohli: आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली टी-20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचा भाग नसल्याचं बोललं जात आहे.

दैनिक गोमन्तक

Rohit Sharma And Virat Kohli: टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघात अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली टी-20 इंटरनॅशनलमध्ये टीम इंडियाचा भाग नसल्याचं बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, रोहित आणि विराटची यापुढे टी-20 टीममध्ये निवड होणार नाही.

काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले होते की, 'आता टीम पुढील टी-20 वर्ल्ड कपसाठी तयार आहे.' तेव्हापासून या दोन्ही फलंदाजांची टी-20 संघात निवड होणार नसल्याचा अंदाज बांधला जात होता.

तसेच, रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना टी-20 संघापासून दूर ठेवण्यात येणार आहे. अलीकडेच, श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने शानदार कामगिरी करत मालिका 2-1 अशी जिंकली. संघाची ही कामगिरी पाहून बीसीसीआय असे कठोर निर्णय घेऊ शकते.

दोघांची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द आतापर्यंत अशी राहिली आहे

रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 140 डावांमध्ये त्याने 31.32 च्या सरासरीने आणि 139.24 च्या स्ट्राईक रेटने 3853 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 शतके आणि 29 अर्धशतके केली आहेत.

तर विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 107 डावांमध्ये त्याने 52.73 च्या सरासरीने आणि 137.96 च्या स्ट्राईक रेटने 4008 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 37 अर्धशतके केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025 Final: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका फायनल सामना? Live मोफत कुठे पाहता येणार?

बॉलिवूडची 'श्री'कन्या, साऊथची 'अचियम्मा'! जान्हवी कपूरच्या 'Achiyyamma' लूकची हवा; राम चरणसोबत गाजवणार दक्षिणी सिनेमा

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

Goa Today's News Live: डिचोलीत बिबट्याची पुन्हा दहशत

Konkani Drama Competition: फसलेला प्रयोग, पिकिल्ली पानां तुटिल्ली मना; नाट्यसमीक्षा

SCROLL FOR NEXT