Pranali Kodre
भारताकडून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 9 खेळाडूंनी शतके केली आहेत.
भारताकडून सर्वाधिक 4 आंतरराष्ट्रीय टी20 शतके रोहित शर्माने केली आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव असून त्याने आत्तापर्यंत 3 आंतरराष्ट्रीय टी20 शतके केली आहेत.
तसेच दोन आंतरराष्ट्रीय टी20 शतकांसह केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
याशिवाय दीपक हुडा, विराट कोहली, सुरेश रैना, शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी भारताकडून प्रत्येकी 1 आंतरराष्ट्रीय टी20 शतक केले आहे.
सुरेश रैना
भारताकडून सर्वात आधी सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय टी20 शतक करण्याचा कारनामा केला होता.
दरम्यान, भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च नाबाद 122 धावांची वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
दीपक हुडाने 2022 मध्ये आयर्लंडविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले टी20 शतक झळकावले होते.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वोच्च नाबाद 126 धावांची वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम शुमबन गिलच्या नावावर आहे.
यशस्वी जयस्वालने चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेपाळविरुद्ध खेळताना १०० धावांची खेळी केली होती.
ऋतुराज गायकवाडने त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुवाहाटीत झालेल्या टी20 सामन्यात ठोकले. त्याने नाबाद 123 धावा केल्या.