Shubman Gill - Rohit Sharma Century X/BCCI
क्रीडा

IND vs ENG, Video: कॅप्टन रोहित पाठोपाठ गिलचाही इंग्लंडला शतकी दणका, पाहा दोघांचही सेलिब्रेशन

Rohit Sharma - Shubman Gill Century: इंग्लंडविरुद्ध धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके साजरी केली आहेत.

Pranali Kodre

Rohit Sharma and Shubman Gill scored Century during India vs England 5th Test

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील पाचवा सामना गुरुवारपासून (7 मार्च) सुरु झाला. धरमशाला येथे झालेल्या या कसोटीत भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतकी खेळी केली आहे.

या दोघांनी या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतकाला गवसणी घातली. रोहितचे हे 12 वे कसोटी शतक ठरले, तर गिलने चौथे कसोटी शतक ठरले. या सामन्यात दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र रोहित आणि गिल यांनी पूर्ण खेळून काढताना शतकी भागीदारीही केली.

या सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्याच दिवशी 218 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने पहिली विकेट्स यशस्वी जयस्वालच्या रुपात गमावली. पण त्यानंतर गिल आणि रोहित यांची जोडी जमली. त्यांनी फिरकीपटूंविरुद्ध आक्रमक फलंदाजीही केली.

रोहितने डावाच्या 58 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव काढत त्याच्या शतकाला गवसणी घातली. त्याने 154 चेंडूत त्याचे हे शतक पूर्ण केले. तसेच पुढच्याच 59 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गिलनेही चौकार ठोकत त्याचे शतक पूर्ण केले. त्याने 137 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले.

त्यांनी एकापोपाठ एक सेलिब्रेशन करत शानदार सेलिब्रेशनही केले. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये संघसहकाऱ्यांनी या दोघांचेही टाळ्या वाजवत कौतुक केले. त्यांच्या शतकामुळे भारताने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात 60 षटकात 1 बाद 264 धावा केल्या होत्या.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की रोहित आणि गिल यांचे इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतीलही हे प्रत्येकी दुसरे शतक आहे. तसेच या दोघांनीही या मालिकेत 400 धावांचा टप्पाही पार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

SCROLL FOR NEXT