IND vs ENG 5th Test: शानदार 5 विकेट्स! इंग्लिश संघावर एकटा कुलदीप 'भारी'; कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतकांसह केला मोठा रेकॉर्ड

IND vs ENG 5th Test: भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने धरमशालामध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडच्या संघाचे कंबरडे मोडले.
IND vs ENG 5th Test Kuldeep Yadav Five Wickets
IND vs ENG 5th Test Kuldeep Yadav Five WicketsDainik Gomantak

IND vs ENG 5th Test Kuldeep Yadav Five Wickets:

भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने धरमशालामध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडच्या संघाचे कंबरडे मोडले. कुलदीपच्या फिरकीत इंग्लिश फलंदाज पूर्णपणे अडकले. त्याने येथे आपल्या कसोटी कारकिर्दीत चौथ्यांदा पाच विकेट्सचा हॉल पूर्ण केला. त्याने पहिल्यांदाच इंग्लंडच्या आघाडीच्या 4 फलंदाजांना बाद केले. त्यानंतर त्याने कर्णधार बेन स्टोक्सला खातेही उघडू दिले नाही आणि त्याच्या रुपात पाचवी विकेट घेतली. याआधी कुलदीपने जॉनी बेअरस्टोची विकेट घेत खास अर्धशतकही पूर्ण केले. इंग्लंडचा संघ अडचणीत सापडला आणि 175 धावांवर सहावी विकेट गमावली.

कुलदीप यादवने कसोटीत 50 बळी पूर्ण केले

दरम्यान, कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) हा 12 वा कसोटी सामना आहे. या सामन्यात कुलदीपने जॉनी बेअरस्टोला बाद करत चौथी विकेट घेत 50 कसोटी बळी पूर्ण केले. स्टोक्सची विकेट ही त्याच्या कारकिर्दीतील 51वी विकेट होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी उत्कृष्ट आहे. त्याने 12 च्या सरासरीने 51 कसोटी बळी पूर्ण केले आहेत.

एवढेच नाही तर कुलदीप यादव गेल्या 100 वर्षात सर्वात कमी चेंडूत 50 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. याशिवाय, तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो भारताचा पाचवा गोलंदाज ठरला आहे.

त्याच्या आधी आर अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी भारतासाठी हा पराक्रम केला आहे. कसोटी, एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50-50 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्यात यशस्वी ठरलेले गोलंदाज जगात मोजकेच आहेत.

IND vs ENG 5th Test Kuldeep Yadav Five Wickets
IND vs ENG: धरमशालामध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? 2017 मध्ये कांगारुंचा उडवला होता धुव्वा

दुसरीकडे, कुलदीप यादवने 2017 मध्ये याच मैदानावर कसोटी पदार्पण केले. धरमशालाच्या या सुंदर स्टेडियममध्ये त्याने 50 बळी पूर्ण केले आणि चौथ्यांदा पाच विकेट्स घेतल्या. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये एकूण 51 बळी घेतले आहेत (पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावातील 5 विकेट्ससह). त्याचा इकॉनॉमी रेट 3.44 आहे, तर सरासरी 21.02 आहे. एका सामन्यात 113 धावांत 8 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

इंग्लंडने 8 धावांत पाच विकेट गमावल्या

एकवेळ इंग्लंड संघाची धावसंख्या तीन विकेट्सवर 175 धावांवर होती. यानंतर कुलदीप, जडेजा आणि अश्विन या त्रिकुटाने इंग्लिशच्या पाच खेळाडूंना 8 धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. इंग्लंडची धावसंख्या 8 बाद 183 अशी झाली. बेन डकेट आणि जॅक क्रॉलीची सलामीची भागीदारी 64 धावांची होती. त्यानंतर एकही फलंदाज टिकू क्रीझवर शकला नाही. क्रॉली हा आतापर्यंतचा एकमेव यशस्वी फलंदाज ठरला. त्याने आपल्या संघासाठी 79 धावांची शानदार खेळी खेळली.

IND vs ENG 5th Test Kuldeep Yadav Five Wickets
IND vs ENG: बेअरस्टोचे 'शतक' नक्की, तर 'या' गोलंदाजाचे पुनरागमन; धरमशाला कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग-11 जाहीर

बेन स्टोक्सने टॉस जिंकला

दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, असे बोलले जात होते. पण भारतीय फिरकीपटूंनी ते चुकीचे ठरवले. लंचपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 100 धावा होती. त्यानंतर टीब्रेकपर्यंत इंग्लंडने (England) 8 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सेशनमध्ये इंग्लिश संघाच्या सहा विकेट पडल्या. त्यापैकी कुलदीपला तीन, अश्विनला दोन आणि जडेजाला एक विकेट मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com