Rohit Sharma gave this advice to Sanju Samson Video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: "दुखी मत हो भाई, मौका कभी भी आ सकता है" हिटमॅनचा 'तो' कानमंत्र अन् संजू सॅमसनचा वेस्ट इंडिजविरुद्ध धमाका

Rohit Sharma gave this advice to Sanju Samson: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे संजू सॅमसनच्या नावाची.

Sameer Amunekar

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे संजू सॅमसनच्या नावाची. वेस्ट इंडिजविरुद्ध ९७ धावांची खेळी करून भारताला विजय मिळवून देणाऱ्या संजूचा इथपर्यंतचा प्रवास एखाद्या 'रोलरकोस्टर' पेक्षा कमी नव्हता. टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीला इशान किशनच्या जबरदस्त फॉर्ममुळे संजूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले होते. मात्र, अशा कठीण काळात भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माने दिलेला एक मोलाचा सल्ला आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वानखेडेवर झाला होता तो 'खास' संवाद

ही घटना स्पर्धेच्या सुरुवातीची आहे, जेव्हा भारतीय संघ अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सराव करत होता. संजू सॅमसनला त्या सामन्यात संघात स्थान मिळाले नव्हते, ज्यामुळे तो काहीसा निराश दिसत होता. अशा वेळी रोहित शर्मा स्वतः संजूकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "कसा आहेस? दुखी नको होऊ भावा. हा खूप मोठा डोलारा (टूर्नामेंट) आहे, संधी कधीही चालून येऊ शकते." आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला असून, चाहत्यांकडून रोहितच्या या नेतृत्वाचे कौतुक होत आहे.

रोहितचे शब्द ठरले खरे; संजूचे शानदार पुनरागमन

रोहितने दिलेला हा शब्द अखेर खरा ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघात बदलाची गरज भासली आणि संजूला पुन्हा संधी मिळाली. त्याने प्रथम झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात छोटी पण आक्रमक खेळी केली आणि त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध अशी खेळी साकारली जी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. संजूने या संधीचे सोने करत टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.

विराट-रोहितकडून घेतले संयमाचे धडे

विजयानंतर बोलताना संजू सॅमसन भावूक झाला होता. त्याने आपल्या यशाचे श्रेय दिग्गज खेळाडूंना दिले. संजू म्हणाला, "मी गेल्या १०-१२ वर्षांपासून आयपीएल खेळत आहे आणि भारतीय संघासोबत आहे. जरी मी नेहमी मैदानात नसलो, तरी डगआऊटमध्ये बसून मी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या महान खेळाडूंचे निरीक्षण केले. ते कठीण प्रसंगात कसे खेळतात, हे शिकणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले." संजूच्या या प्रतिक्रियेने त्याने केवळ धावाच नाही, तर चाहत्यांची मनेही जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी 'GAY', डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'रिपोर्ट वाचून मला हसू आलं'

Hidden Gems in Goa: उन्हाळ्याच्या उकाड्यात गोव्याचा गारवा! एप्रिल-मेमध्ये सहलीचे नियोजन करताय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

Tecno Spark 50 5G: 6500 mAh बॅटरी, 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा...टेक्नोने लाँच केला नवा स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स

Viral Video: शिंगाला शिंग भिडलं अन् उडाला थरार! भररस्त्यात सांडांची थरकाप उडवणारी झुंज; युजर म्हणाले, ''हा नक्कीच गर्लफ्रेंडचा मॅटर दिसतोय''

Nepal PM Oath Ceremony: नेपाळमध्ये 'बालेन' युगाचा उदय! रॅपर ते PM... बालेंद्र शाह यांनी घेतली 47 वे पंतप्रधान म्हणून शपथ

SCROLL FOR NEXT