Goa Weather
Goa WeatherDainik Gomantak

Goa Weather: गोव्यात निसर्गाचा 'डबल गेम'! दुपारी अंगाची लाहीलाही तर रात्री हुडहुडी; पाहा हवामान खात्याचा नवा इशारा

Goa Weather Update: गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे गोवेकर सध्या 'दुपारी उन्हाळा आणि रात्री हिवाळा' अशा दुहेरी हवामानाचा सामना करत आहेत.
Published on

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात विचित्र हवामानाचा अनुभव येत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे गोवेकर सध्या 'दुपारी उन्हाळा आणि रात्री हिवाळा' अशा दुहेरी हवामानाचा सामना करत आहेत. पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून येत्या दोन-तीन दिवसांत उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वेधशाळेचा इशारा

मागील ४८ तासांत राज्याच्या विविध भागांत उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या आहेत. सोमवारी कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर किमान तापमान २१.६ अंशांच्या आसपास राहिले. दिवसा कडक ऊन पडत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर सूर्यास्तानंतर वातावरणात अचानक सौम्य गारवा जाणवू लागतो. हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, हा ऋतुबदलाचा काळ असून उत्तरेकडून येणारे वारे आणि आर्द्रतेतील बदल यामुळे तापमानात ही चढ-उतार पाहायला मिळत आहे.

Goa Weather
Goa Bomb Threat: मोठी बातमी! पणजीतील पासपोर्ट भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची धावपळ अन् परिसरात भीतीचे वातावरण

वाढत्या उष्म्याचा विचार करता, गोवा वेधशाळेने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. विशेषतः दुपारी ११ ते ३ या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते, त्यामुळे शक्य असल्यास या काळात घराबाहेर पडणे टाळावे. जर बाहेर जाणे अनिवार्य असेल, तर डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. निर्जलीकरण टाळण्यासाठी शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

Goa Weather
Goa Shigmo Festival: डिचोलीत शिमगोत्सवाचा जल्लोष; सर्वत्र उत्साह, घुमचे कटर घूम; परंपरा, श्रद्धा आणि जल्लोषाचा संगम

बदलत्या हवामानाचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांवर होण्याची शक्यता असते. या काळात सुती आणि सैल कपड्यांना प्राधान्य द्यावे. आहारात लिंबूपाणी, ताक, शहाळे पाणी यांसारख्या नैसर्गिक पेयांचा समावेश करावा. या 'डबल ऋतू'मुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com